VIDEO: सापाने गिळला जिवंत साप आणि नंतर....

By Admin | Updated: May 30, 2017 14:43 IST2017-05-30T14:43:18+5:302017-05-30T14:43:18+5:30

फक्त दोन दिवसांत तब्बल दोन लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे

VIDEO: The snake devoured the snake and then .... | VIDEO: सापाने गिळला जिवंत साप आणि नंतर....

VIDEO: सापाने गिळला जिवंत साप आणि नंतर....

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - साप म्हटलं तर कोणाचाही थरकाप उडतो. साप समोर आल्यावर हालचाल करु नये असं सांगितलं तरी तो समोर दिसताच माणूस जिवाच्या आकांताने धावत सुटतो. सापाने उंदीर, मांजराला आपलं भक्ष्य केल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहिलं, ऐकलं असेल पण एका सापाने दुस-या सापाला कधी गिळल्याचं तुम्ही पाहिलंय का ? युट्यूबवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. या व्हिडीओमध्ये एक साप दुस-या सापाला गिळताना दिसत आहे. 
 
हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सापाने दुस-या सापाला जिवंत गिळल्याचं या व्हिडीओ स्पष्ट दिसत आहे. पण जेव्हा त्याला पचवू शकला नाही तेव्हा त्याने सापाला बाहेर काढलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो साप बाहेर पडला तेव्हा जिवंत होता.
 
हा व्हिडीओ क्रिस्टोफर रेनॉल्ड्स नावाच्या एका व्यक्तीने पोस्ट केला आहे. क्रिस्टोफरने व्हिडीओसबत लिहिलं आहे की, "मी आणि माझी पत्नी आईच्या घरी चाललो होतो. त्यावेळी मला हा साप दिसला. मी गाडी थांबवून त्याचे काही फोटो काढण्यास सुरुवात केली. माझी पत्नी निना म्हणाली मी व्हिडीओ शूट करते. आम्ही व्हिडीओ शूट केला याचा आम्हाला आनंद आहे". 
 
व्हिडीओत रेनॉल्ड्स बोलत आहे की, जिवंत बाहेर आलेल्या सापासाठी आजचा दिवस अल्ट्रा लॉटरी लकी डे आहे. हा व्हिडीओ 28 मे रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. फक्त दोन दिवसांत तब्बल दोन लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 
 

Web Title: VIDEO: The snake devoured the snake and then ....