VIDEO: प्रेयसीचा पती अचानक घरी, जीव वाचवायला ८व्या मजल्यावर लटकला प्रियकर
By Admin | Updated: July 4, 2016 14:08 IST2016-07-04T13:18:03+5:302016-07-04T14:08:46+5:30
प्रेयसीचा पती अचानक घरी आल्याने लपण्यासाठी जागा नसलेल्या प्रियकराला इमारतीच्या आठव्या माळ्यावर लटकावं लागलं

VIDEO: प्रेयसीचा पती अचानक घरी, जीव वाचवायला ८व्या मजल्यावर लटकला प्रियकर
ऑनलाइन लोकमत -
बिजिंग, दि. 04 - प्रेयसीचा पती अचानक घरी आल्याने लपण्यासाठी जागा नसलेल्या प्रियकराला इमारतीच्या आठव्या माळ्यावर लटकावं लागलं. चीनमध्ये ही घटना घडली असून हा प्रियकर लटकतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे.
प्रेयसीचा पती घरी नसल्याची संधी साधत प्रियकर तिच्या घरी गेला होता. पण पती काहीच न कळवता घरी आल्याने दोघांचीही पळापळ झाली. या प्रियकराला कपडे घालण्याचीही संधी न मिळाल्याने त्याच अवस्थेत खिडकीबाहेरच्या एसीला तो लटकला. आठ माळ्याच्या या इमारतीवरुन जर त्याचा तोल गेला असता तर त्याचं हे प्रेमप्रकरण त्याच्या चांगलंच अंगलट आलं असतं.