VIDEO - फक्त 30 सेकंदांत मगरीच्या पिलाला गिळलं बगळ्यानं
By Admin | Updated: February 16, 2017 11:45 IST2017-02-16T11:45:35+5:302017-02-16T11:45:35+5:30
एका बगळ्यानं चक्क 30 सेकंदांत मगरीच्या पिल्लाला गिळंकृत केलं आहे.

VIDEO - फक्त 30 सेकंदांत मगरीच्या पिलाला गिळलं बगळ्यानं
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 16 - सोशल मीडियावर अनेक गोष्टी वायरल होत असतात. त्यातील काही गोष्टी पाहून अचंबित व्हायलं होतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. एका बगळ्यानं चक्क 30 सेकंदांत मगरीच्या पिल्लाला गिळंकृत केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बगळा मगरीच्या पिलाला खाताना दिसत आहे.
जंगलात बगळा शिकारच्या शोधात पाण्यात उभा असतानाच अचानक त्याची नजर मगरीच्या पिलावर पडते आणि तो त्याच्यावर हल्ला करतो. त्यानंतर तो त्या मगरीच्या छोट्या पिलाला अवघ्या काही सेकंदांत भक्ष्य करतो. जवळपास 1 फूट लांब असलेल्या मगरीच्या पिलाला खाण्यासाठी बगळ्याला फक्त काही सेकंदांचा अवधी लागल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.