शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

क्षेपणास्त्र डागणाऱ्या इराणी सैनिकांना इस्रायलने संपवले; IDF ने समोर आणला हल्ल्याचा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:43 IST

इस्रायलने इराणी सैनिकांवर बॉम्बहल्ला करत त्यांचे मोठे नुकसान केले आहे.

Iran Vs Israel War: गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेला जोरदार संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. इस्रायलनेइराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. इस्रायलने इराणच्या विरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ राबवत जगाची चिंता वाढवली आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केलं तर इराणने इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता इस्रायल इराणी सैनिकांना एक एक करुन लक्ष्य करत आहे.

इस्रायली हवाई दलाने इराणवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. इस्रायली हवाई दलाने जमिनीवरून हवेत क्षेपणास्त्रे डागणाऱ्या इराणी सैनिकांची ओळख पटवून त्यांना हल्ल्यात नष्ट केले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने या हल्ल्याचा व्हिडीओ जारी करत इशारा दिला आहे. तेहरानच्या दक्षिणेकडील लाँचरवर पोहोचण्यापूर्वी काही सेकंद आधी, इस्रायली हवाई दलाने जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागणारे सैन्य ओळखले आणि ते नष्ट केले. सैन्याला हटवण्यात आले आणि लाँचर नष्ट करण्यात आलेत. संपूर्ण इराणमधल्या हवाई क्षेत्रावर प्राबल्य मिळवण्यासाठी आयएएफ कार्यरत आहे, असं इस्रायल डिफेन्स फोर्सने म्हटलं. इस्रायली सैन्याच्या या हल्ल्यात, फक्त इराणी सैनिकच नाही तर त्यांचे लॉन्च पॅडदेखील पूर्णपणे नष्ट झाले आहेत. या हल्ल्यामुळे इराणच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेचे गंभीर नुकसान झाले आहे. हा इस्रायलच्या लष्करी रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता, असं आयडीएफचे म्हणणं आहे. जारी केलेल्या व्हिडीओमध्ये इस्रायली हवाई दलाने इराणी सैनिकांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये सैनिकांवर, वाहनांवर हल्ला होताना दिसत आहे.

दरम्यान, इस्रायने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इराणने दिलेल्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सोमवारी इराणच्या सैन्याने इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायलकडून इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. इस्त्रायलने इराणमध्ये असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या साऊथ पार्स गॅस क्षेत्रावर बॉम्ब हल्ला केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला आहे.

दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरानमधून लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे. शहर सोडण्याच्या प्रयत्नात रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तेहरानवर इस्रायलने केलेले बॉम्बहल्ला, क्षेपणास्त्र हल्ले यामुळे तिथे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराण