शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Video: 'वर रुग्णालय, खाली दहशतवादी मुख्यालय', इस्रायलने जगासमोर आणला 'तो' बोगदा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 19:11 IST

Video of Tunnel in Shifa Hospital: गाझातील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयाखाली हमासचा सर्वात मोठा बोगदा आढळला आहे.

Israel Hamas War Updates: इस्रायल आणि हमास युद्धाने भीषण वळणावर आले आहे. दरम्यान, इस्रायलकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे, ज्यात हमासने संपूर्ण गाझा पट्टीमध्ये बोगदे बनवल्याचे समोर आले आहे. या बोगद्यांमध्येच हमासचे दहशतवादी लपायचे. इस्रायली लष्कराने गाझामध्ये बांधलेल्या सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयाचा ताबा घेतला. यानंतर त्यांना हॉस्पिटलच्या खाली सर्वात लांब बोगदा सापडला. हा बोगदा हॉस्पिटलपासून शहराच्या आत जातो. 

इस्रायली लष्कराने गुरुवारी गाझामधील सर्वात मोठ्या बोगद्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केले. इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की हा बोगदा एका विशाल भूमिगत नेटवर्कचा भाग होता, ज्याचा वापर हमासकडून लष्करी हेतूने केला जायचा. अल-शिफा हॉस्पिटलचा वापर हमासकडून शस्त्रे आणि कमांड सेंटर लपवण्यासाठी केला जात होता. इस्रायलने पलटवार केल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलवर हल्ला केल्याचा अपप्रचार केला, अशी माहिती इस्रायली अधिकार्‍यांनी दिली.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये इस्रायली सैनिक अल-शिफा हॉस्पिटलजवळील एक बोगदा दाखवतात. या बोगद्याच्या आत एक स्नानगृह, एक स्वयंपाकघर आणि एक वातानुकूलित खोली सापडली. या बोगद्यात शिरण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेरील मैदानात एक रस्ता तयार करण्यात आला होता. यातूनच हमासचे दहशतवादी आत शिरायचे आणि बोगद्यात गायब व्हायचे. इस्रायली सैन्याने काही पत्रकारांनाही या बोगद्यात जाऊन पाहणी करू दिली. लष्कराने बोगद्यातून मोठ्या प्रमाणात बंदुका, दारूगोळा आणि इतर स्फोटकेही जप्त केली.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीय