VIDEO: लग्नात नव-याने घेतली WWE स्टाइलमध्ये एन्ट्री

By Admin | Updated: March 7, 2017 11:57 IST2017-03-07T11:48:17+5:302017-03-07T11:57:25+5:30

एका लग्नात नव-याने चक्क WWE चा स्टार खेळाडू ट्रिपल एच च्या स्टाइलमध्ये घेतली एन्ट्री

VIDEO: Entry in the WWE Style on New-Age Wedding | VIDEO: लग्नात नव-याने घेतली WWE स्टाइलमध्ये एन्ट्री

VIDEO: लग्नात नव-याने घेतली WWE स्टाइलमध्ये एन्ट्री

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - प्रत्येकाला आपल्या लग्नात विशेष काहीतरी करायचं असतं. पाकिस्तानमधील एका लग्नात नव-याने चक्क WWE च्या खेळाडूप्रमाणे एन्ट्री घेतली. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये हे लग्न झालं. 
 
लाहोरचा रहिवासी कीचू अहमेरने स्वतःच्या लग्नात WWE चा स्टार खेळाडू ट्रिपल एच च्या स्टाइलमध्ये आणि त्याच्याच थिम सॉन्गवर लग्नमंडपात एन्ट्री घेतली. त्यामुळे तो पाकिस्तानी मिडीयामध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला.  
 
 लग्नमंडपात एन्ट्री घेताना किचू याच्या खांद्यावर चॅम्पियनशीपचा बेल्ट होता शिवाय तो ट्रिपल एच प्रमाणे हातात पाण्याची बॉटल घेऊन आला. त्याच्या एन्ट्रीवेळी चारही बाजुंनी फटाके फुटत होते.  
 
हा व्हिडीओ ‘Sarcas mistan’ नावाच्या एका फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1.3 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. 18 हजाराहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून 12 हजार 309 लोकांनी आतापर्यंत शेअर केला आहे. 
  

Web Title: VIDEO: Entry in the WWE Style on New-Age Wedding