VIDEO : चीनमध्ये विराट वाहतूक कोंडी, 40 पदरी हायवेही ठप्प
By Admin | Updated: January 4, 2017 11:36 IST2017-01-04T11:34:59+5:302017-01-04T11:36:31+5:30
चीनची राजधानी बीजिंग येथे मोटरवे टोलनाक्याजवळ अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाले होते.

VIDEO : चीनमध्ये विराट वाहतूक कोंडी, 40 पदरी हायवेही ठप्प
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 4 - चीनची राजधानी बीजिंग येथे मोटरवे टोलनाक्याजवळ अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाले होते. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओतील आवासून पाहाल, कारण कधीही पाहिली नसेल एवढी प्रचंड वाहतूक कोंडी तुम्हाला यात दिसेल. मोटरवे टोलनाक्यामुळे बीजिंगमधील तब्बल 40 पदरी हायवेही वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाल्याचे बोलले जात आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला हजारोंच्या संख्येनं गाड्या एका मागोमाग एक खोळंबलेल्या दिसतील. न्यू इअर सेलिब्रेशन करुन पतरणा-या चीनमधील नागरिकांना ट्रॅफिकच्या खोळंब्यात नवं वर्षांचे स्वागत करावे लागले.