VIDEO- ...आणि डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले
By Admin | Updated: November 6, 2016 08:50 IST2016-11-06T07:48:24+5:302016-11-06T08:50:35+5:30
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिस एजंटनं सुरक्षेच्या कारणास्तव चक्क स्टेजवर घेराव घालून त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले.

VIDEO- ...आणि डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले
ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. 6 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिस एजंटनं सुरक्षेच्या कारणास्तव चक्क स्टेजवर घेराव घालून त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले. नेवाडा येथे एका रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते. मात्र त्याचदरम्यान सिक्रेट सर्व्हिस एजंटचे काही अधिकारी स्टेजवर आले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेसाठी स्टेजवरून खाली उतरवून सुरक्षाकडे निर्माण केले.
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेला मोठी गर्दी होती. त्याच गर्दीतून डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र काही मिनिटांनंतर पोलीस टक्कल असलेल्या एका संशयिताला बेड्या ठोकून घेऊन गेले. या संशयितापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीविताला धोका असण्याची शक्यता सिक्रेट सर्व्हिस एजंटनं व्यक्त केली आहे.
दरम्यान त्यानंतर ट्रम्प पुन्हा स्टेजवर आले आणि म्हणाले, "हे सोपे असेल, असं मला कोणीच सांगितले नव्हतं. मात्र आता आम्ही थांबणार नाही. मी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानू इच्छितो. त्यांनी त्यांचे काम उत्तमरीत्या केलं आहे," असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण संपवलं.
#WATCH Donald Trump was rushed off stage during his Reno, Nevada campaign rally; one man escorted out in handcuffs by police. pic.twitter.com/YJb2i705wa
— ANI (@ANI_news) November 6, 2016