इटलीच्यापंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी जॉर्जिया मेलोनी यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले. त्यानंतर त्यांनी हात जोडून नमस्कार केला. असं जबरदस्त स्वागत झाल्यावर जॉर्जिया मेलोनी देखील भारावून गेल्या.
अल्बेनियाची राजधानी टिराना येथे यूरोपियन पॉलिटिकल कम्यूनिटी समिट सुरू आहे. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी टिराना येथे पोहोचल्या आहेत. त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. जॉर्जिया मेलोनी या गाडीमधून खाली उतरतात आणि रेड कार्पेटवरून चालत पुढे जातात. त्यांच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा हे समोर उभे असतात.
जॉर्जिया मेलोनी येताच पंतप्रधान एडी रामा हे अचानक भर पावसात गुडघ्यावर बसतात, हातातील छत्री बाजुला ठेवतात आणि हात जोडून त्यांचं स्वागत करतात. यानंतर रेड कार्पेटवरून इटलीच्या पंतप्रधान हसत हसत पुढे आल्या आणि त्यांनी हस्तांदोलन केलं. एडी रामा यांची गळाभेट घेतली आणि एकत्र फोटो काढले आहेत. अल्बेनियन पंतप्रधानांनी केलेलं स्वागत लोकांना फारच आवडलं असून सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
सोशल मीडियावर अल्पावधीतच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. मेलोनी यांच्या विशेष स्वागताबद्दल अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांचं युजर्स कौतुक करताना दिसत आहेत. एडी रामा यांनी जॉर्जिया मेलोनी यांचं अशा प्रकारे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जानेवारीमध्ये अबू धाबी येथे झालेल्या वर्ल्ड फ्यूचर एनर्जी समिटदरम्यान अल्बेनियाचे पंतप्रधानांनी मेलोनी यांच्या वाढदिवशी असंच केलं होतं. तसेच मेलोनी यांना एक स्कार्फही गिफ्ट म्हणून दिला.