शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 08:29 IST

Victor Blaho videos: व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला.

‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती आहे, असं आपण म्हणतो; पण आपल्याकडे आलेल्या अतिथींना आपण देतो ते अनुभव खरंच तेवढे छान असतात का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा अशा बातम्या सध्या चहुबाजूंनी कानावर येत आहेत. पुण्यातल्या सिंहगडावर आलेल्या एका परदेशी प्रवाशाला स्थानिक लोकांनी ‘मराठी भाषा शिकवतो’ असं म्हणत चक्क शिव्या शिकवल्या. त्याबाबतचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होताच हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे. त्यानंतर आता एका फ्रेंच पर्यटकाचा अनुभव समोर आला आहे. ‘इंडियन रेल्वे’चा प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुखकर असतो, असं म्हटलं जातं; पण एका फ्रेंच पर्यटकाने मात्र, ‘भारतात जाताय? मग रेल्वेचा प्रवास करु नका,’ असं थेट आवाहनच केलं आहे. 

व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला. बास झालं भारत दर्शन, आपण आपलं गुपचूप आपल्या घरी परत जावं असं त्याला वाटलं. आपला हा अनुभव त्याने शेअर केला आहे आणि ‘भारतात फिरायला जाताय? सावधान...’ असा इशारा इतर परदेशी पर्यटक, प्रवाशांना दिला आहे. 

त्याबद्दलचा व्हिडीओ त्याने यूट्यूबवर अपलोड केला आहे. भारत भेटीवर आलेल्या व्हिक्टरने मुंबई ते वाराणसी, वाराणसी ते आगरा आणि आगरा ते दिल्ली असा तब्बल ४६ तासांचा रेल्वे प्रवास केला. स्लीपर कोचपासून ते थर्ड एसीपर्यंत रेल्वेच्या विविध ‘क्लास’मधून त्याने प्रवास केला. या प्रवासात काही फार सुंदर तर काही अत्यंत भयंकर अनुभव आल्याचं व्हिक्टरने म्हटलं आहे. दुर्दैवाने भयंकर अनुभवांचं पारडं अधिक जड असल्याचंही तो सांगतो.

भारतीय रेल्वेचे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. या डब्यांमध्ये नुसता कलकलाट असतो, त्यामुळे प्रवासात अजिबात शांतता मिळत नाही,’ अशी तक्रार व्हिक्टरने केली आहे. रेल्वेच्या डब्यांमध्ये उंदीर, झुरळं दिसली. त्यामुळे आता मला भारतातल्या रेल्वे प्रवासाची किळस वाटते आहे, असंही त्याने सांगितलं आहे. 

रेल्वेचा प्रवास आणि स्वच्छता यांचा दुरान्वयेही संबंध नाही. सगळीकडे कचरा असतो, त्याचा घाण वास येतो असं सांगत त्याने नाक मुरडलं आहे. उंदीर आणि झुरळं तर सोडूनच द्या; पण रात्रीच्या वेळी शांत झोपू असं म्हणून भारतात तुम्ही रेल्वेच्या प्रवासाचा पर्याय निवडत असाल तर थांबा. इथे रेल्वेच्या डब्यांमध्ये माणसं नुसती उच्च आवाजात बोलत असतात. त्यामुळे प्रचंड गोंगाट असतो. लोक सतत इकडून तिकडे चालत असतात. मी एक मिनिटही शांत झोपू शकलेलो नाही, असं व्हिक्टर त्याच्या व्हिडीओमध्ये सांगतो. 

या सगळ्या अनुभवात भर म्हणून एका स्थानिक प्रवाशाने त्याला व्हिडीओ कॉलवरून आपल्या गर्लफ्रेंडशी बोलायला लावलं. त्याच्याबरोबर फोटो काढले. सतत त्याच्याशी गप्पा मारून त्याला वैताग दिला. ‘मला या सगळ्यांचा त्रास होतोय.  मला आता शांतता हवी आहे. मला घरी जायचंय. मला शांत झोपायचंय, मला स्वच्छ बेड हवाय, कलकलाट नकोय,’ असं म्हणत व्हिक्टरने आपल्या वैतागाला वाट मोकळी करून दिली आहे.व्हिक्टरच्या या व्हिडीओवर आता भारतीयांनी टीकेची झोड उठवली आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेYouTubeयु ट्यूब