शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात; ‘क्लाउड सीडिंग’ने केला घात; दीड वर्षाचा पाऊस एका दिवसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 05:15 IST

वाळवंटी दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात;  लोक झोपले विमानतळावर

दुबई : वाळवंटी देश संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मंगळवारी विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वाहने पाण्याखाली बुडल्याने लोकांना मोठा फटका बसला. दुबई विमानतळावर अतिवृष्टी, पुरामुळे उड्डाणांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.सोमवारी रात्री उशिरा पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्त्यांवर पूर आल्याची परिस्थिती होती. अनेक गाड्या पाण्यामध्ये तरंगत होत्या. यानंतर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास जोरदार वादळ आले. यासोबतीला मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. एका जोडप्याने सांगितले की, विमानतळावरील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तुम्हाला टॅक्सी मिळू शकत नाही. अनेक लोक मेट्रो स्टेशनवर झोपले आहेत. तर अनेक लोक विमानतळावर झोपले आहेत.

१९४९ पासून प्रथमच असे घडले...मंगळवारचा पाऊस ही एक ऐतिहासिक हवामान घटना होती, इतका पाऊस १९४९ मध्ये डेटा संकलन सुरू झाल्यापासून सर्वाधिक नोंदवला गेला आहे. बहारीन, ओमान, कतार आणि सौदीतही पाऊस पडला. मात्र, सर्वाधिक पाऊस हा यूएईमध्ये झाला.

असे का झाले? - कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात सरकारने छोटी विमाने तैनात केली होती. त्यामुळे ‘क्लाउड सीडिंग’ झाल्याने मुसळधार पाऊस  पडल्याचे सांगण्यात आले. - शास्त्रज्ञांनी सांगितले की, पावसापूर्वी सहा किंवा सात ‘क्लाउड सीडिंग’ उड्डाणे घेण्यात आली होती. यामुळेच मुसळधार पाऊस पडल्याची शक्यता आहे. यूएईमध्ये कमी होत जाणारे, भूजल भरून काढण्यासाठी ‘क्लाउड सीडिंग’चा वापर करण्यात येतो.

पाकमध्ये कहर, ६३ जणांचा मृत्यूपेशावर : पाकिस्तानमध्ये वीज पडून आणि मुसळधार पावसामुळे १४ जणांचा मृत्यू झाला.  गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अत्यंत खराब हवामानामुळे किमान ६३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हवामान खात्याचे अधिकारी झहीर अहमद बाबर यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पाकमध्ये एप्रिलमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे.

टॅग्स :DubaiदुबईRainपाऊस