या पाच मजली इमारतीवरून धावतात वाहने

By Admin | Updated: June 28, 2017 07:00 IST2017-06-28T06:54:24+5:302017-06-28T07:00:55+5:30

एखाद्या इमारतीवरुन वाहने धावतात असे सांगितले तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण, चीनमधील इमारतीवरील हे रस्ते बघितल्यावर आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.

Vehicles running from this five storey building | या पाच मजली इमारतीवरून धावतात वाहने

या पाच मजली इमारतीवरून धावतात वाहने

एखाद्या इमारतीवरुन वाहने धावतात असे सांगितले तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण, चीनमधील इमारतीवरील हे रस्ते बघितल्यावर आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. सद्या सोशल मीडियावर या रस्त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. हा रस्ता पाच मजली इमारतीवर तयार करण्यात आला आहे. इमारतीवरील दुहेरी मार्गावरुन वाहने अगदी सुसाट जातात. रस्यांच्या बाजूला दुकाने आणि झाडेही आहेत. चीनच्या चोंगकिंग शहरात हे अफलातून बांधकाम पहावयास मिळते. रस्त्याखालच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना या वाहनांचा काहीही त्रास होत नाही. कारण, येथे असे काही उपकरणे लावली आहेत जेणेकरुन वाहनांचा आवाज येत नाही. या शहरात एकापेक्षा एक भव्य अशा उड्डाणपुलांचे जाळे आहे.

Web Title: Vehicles running from this five storey building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.