वॉशिंग्टन : भारताच्या विरोधातील एक फळी म्हणून पाकिस्तान तालिबान्यांचा पद्धतशीर वापर करते, असे अमेरिकेचे लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल केनेथ मॅकेन्झी (ज्युनिअर) यांनी सांगितले. अमेरिकी सिनेटच्या लष्करी सेवा समितीच्या सदस्यांसमोर त्यांनी हे मत मांडले.अफगाणिस्थानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करणारे एक पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना पाठविले होते. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानने आपल्या धोरणात फारसा बदल केलेला नाही, असेही मॅकेन्झीम्हणाले.
पाककडून भारताविरोधात तालिबान्यांचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:19 IST