निरोध वापरल्यामुळे एचआयव्ही होण्याची शक्यता कमी
By Admin | Updated: July 23, 2014 04:27 IST2014-07-23T04:27:58+5:302014-07-23T04:27:58+5:30
निरोध वापरल्याने एडस् साठी कारणीभूत असलेल्या एचआयव्हीच्या व्हायरसची बाधा होण्याची शक्यता ९९.९९ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.

निरोध वापरल्यामुळे एचआयव्ही होण्याची शक्यता कमी
ऑनलाइन टीम
सिडनी(ऑस्ट्रेलिया), दि. २२ - निरोध वापरल्याने एडस् साठी कारणीभूत असलेल्या एचआयव्हीच्या व्हायरसची बाधा होण्याची शक्यता ९९.९९ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. स्टारफार्मा या बायोटेक कंपनीने निरोधात वापरण्यात येणा-या जेल मधून एचआयव्ही एड्स होण्याची शक्यता कमी असल्याचे संशोधनातून सिद्ध केले आहे. त्यांनी निरोधात वापरण्यात येणा-या व्हिवाजेलमुळे एचआयव्हीचे विषाणू ९९.९९ टक्क्यांपर्यंत रोखले जात असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. व्हिवा जेल हे अँटी व्हायरल व अँटी बॅक्टेरीअल असल्याचे स्टारफार्माचे कर्मचारी जॅकी फेअरली यांनी सांगितले. तसेच ऑस्ट्रलीयन नियामक संस्थेने या संशोधनाला मान्यता दिली असून काही महिन्यांतच आमचे प्रोडक्ट सर्वत्र उपलब्ध असेल. असे त्यांनी सांगितले.