शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 19:30 IST

USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही.

USA Tariff News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांची मैत्री सर्वश्रृत आहे. विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मैत्रीचे उदाहरण ठेवले आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो शनिवारी संध्याकाळपासून लागू झाला. मात्र यामध्ये भारताचे नाव नाही.

या निर्णयामुळे अमेरिका आणि या देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाले असून, भविष्यात इतर देशांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या मालावर 25% अतिरिक्त शुल्क लावला आहे. तर, चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के शुल्क वाढवण्यात आला आहे. मात्र, कॅनडातून आयात होणाऱ्या तेलावर केवळ 10 टक्के शुल्क असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या करांच्या पहिल्या सेटमध्ये भारताचे नाव नाही. 

दरम्यान, ट्रम्प सरकार लवकरच कॉम्प्युटर चिप्स, फार्मास्युटिकल्स, स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, तेल आणि वायूच्या आयातीवर नवीन शुल्क लावण्याचा विचार करत आहे. युरोपीय देशांवरही असेच शुल्क आकारले जाऊ शकते. व्यापार तुटीमुळे अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेच्या व्यापार तुटीत चीनचा सर्वाधिक वाटारिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम (RIS) नुसार, चीन, मेक्सिको आणि कॅनडा हे अमेरिकेच्या व्यापार तुटीत सर्वात मोठे योगदान देणारे आहेत. चीनचे योगदान 30.2 टक्के, मेक्सिकोचे 19 टक्के आणि कॅनडाचे 14 टक्के आहे, तर भारत या यादीत 9व्या क्रमांकावर आहे.

चीनने तीव्र निषेध नोंदवला चिनी वस्तूंवर कर लादण्याच्या अमेरिकन आदेशाचा चीनने तीव्र निषेध नोंदवला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, ते जागतिक व्यापार संघटनेत खटला दाखल करणार असून, आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणार आहेत. अमेरिकेने एकतर्फी शुल्क वाढ करणे हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे चीनी मंत्रालयाने म्हटले आहे . 

कॅनडाचाही तीव्र विरोध

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफच्या विरोधात बदला म्हणून अनेक अमेरिकन आयातीवर 25% शुल्क लावेल. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे त्यांनाही गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. तर, मेक्सिकन अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनीदेखील अमेरिकन आयातीवर शुल्क लादण्याचा इशारा दिला. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनCanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदी