शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

Coronavirus Update: ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन, फ्रान्समध्ये बिकट परिस्थिती, रशियात ९६८ मृत्यू; तर अमेरिकेत १ हजार उड्डाणं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 22:06 IST

Coronavirus Update: कोरोना महामारीमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: युरोपीय देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे.

Coronavirus Update: कोरोना महामारीमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: युरोपीय देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. ब्रिटनसोबतच फ्रान्समध्येही कोरोनाची नवी लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. फ्रान्समध्ये शनिवारी दिवसभरात तब्बल १ लाख चार हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातच ब्रिटनमध्ये ख्रिसमसचा काळ पाहता कोरोना संक्रमणाचे आकडे सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे. पण शुक्रवारी ब्रिटनमध्ये १ लाख २२ हजार १८६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. 

पीटीआयच्या माहितीनुसार वेल्स, स्कॉटलँड आणि आयर्लंडच्या उत्तर भागात रविवारपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वेल्समध्ये रविवारपासून नाइटक्लब्सवर बंदी घालण्यात आली आहे. तर पब, रेस्टॉरंट आणि सिनेमागृहांवरही निर्बंध लागू करण्या आले आहेत. बंदिस्त जागेत जास्तीत जास्त ३० जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे. तर खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी ५० जणांच्या उपस्थितीला मान्यता असणार आहे. 

रशियात ९६८ जणांचा मृत्यूरशियात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाला असून गेल्या २४ तासात ९६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचे २३७२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच रशियातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढून आता १०,३९२,०२० वर पोहोचला आहे. तर मृत्यूंची संख्या ३०४२१८ इतकी झाली आहे. 

अमेरिकेकडून १ हजार उड्डाणं रद्दअमेरिकेत तर कोरोनानं ख्रिसमसच्या सेलिब्रेशनवर पाणी फेरलं आहे. विमान कंपन्यांनी शनिवारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एअरलाइन्समध्ये कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कंपन्यांना उड्डाणं रद्द करावी लागली असल्याचं कारण दिलं जात आहे. रविवारी अमेरिकेत जवळपास १ हजार उड्डाणं रद्द झाली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUSअमेरिकाBoris Johnsonबोरिस जॉन्सन