नववर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या सैन्यदलांनी एक थरारक कारवाई करत व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना ताब्यात घेऊन अमेरिकेत आणले होते. ३ जानेवारी रोजी पहाटे झालेल्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामध्ये आपल्या ३२ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा व्हेनेझुएलाचा सहकारी देश असलेल्या क्युबाने केला आहे.
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यातील नुकसानीबाबत माहिती देताना क्युबाच्या सरकारने सांगितले की, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात क्युबाचे ३२ नागरिक मारले गेले आहेत. या कारवाईत मारल्या गेलेल्या लोकांच्या सन्मानार्थ ५ आणि ६ जानेवारी रोजी शोक व्यक्त केला जाईल. तसेच या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी व्यवस्थेची घोषणाही केली जाईल.
दरम्यान, अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलामध्ये हल्ला करून राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना अटक केल्यानंतर देशात खळबळ उडालेली आहे. सध्या येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशाच्या माजी उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला आहे. रॉड्रिग्स या डाव्या विचारांची भक्कम पार्श्वभूमी असलेल्या नेत्या आहेत. त्यांनी माडुरोंप्रति आपली एकजूट व्यक्त केली होती. मात्र रॉड्रिग्स यांनाही अमेरिकेने धमकी दिलेली असल्याने पुढे काय होणार, याबाबत आंतरराष्ट्रीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
Web Summary : Cuba claims 32 citizens died in a US attack in Venezuela during President Maduro's arrest. Former VP Rodriguez is interim leader amid unrest.
Web Summary : क्यूबा का दावा है कि वेनेजुएला में अमेरिकी हमले में 32 नागरिक मारे गए। यह हमला राष्ट्रपति मादुरो की गिरफ्तारी के दौरान हुआ। पूर्व उपराष्ट्रपति रॉड्रिग्स अंतरिम नेता हैं।