शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी रद्द केला अमेरिका-इराण करार; तेलाचे दर भडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 12:06 IST

गेल्या काही दिवसांपासून इराण करारावरुन सुरु असलेल्या शंका आता खऱ्या ठरल्या आहेत.

वॉशिंग्टन- गेले काही दिवस इराण करारावरुन सुरु असलेल्या शंका आता खऱ्या ठरल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण अणूकरार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉइंट कॉम्प्रहेन्सिव प्लान फॉर अॅक्शन म्हणजेच जेसीपीओए अशा नावाने हा करार इराण व अमेरिका यांच्यामध्ये ओबामा प्रशासनाने केला होता.  इराणी अणुबॉम्बला थांबवणे अशक्य असल्याचे दिसत नाही, त्यामुळे हा करार मागे घेण्याचा मी निर्णय घेत आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी या कराराला सत्तेत येण्यापूर्वीपासूनच विरोध केला होता. हा करार मूळापासूनच चुकीचा आहे असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.या करारामुळे इराणला भरपूर पैसा मिळेल मात्र त्यांना अण्वस्त्र खरेदी करण्यापासून मात्र रोखता आले नसते. अमेरिकेने इराणवर नवी बंधने घातली असून इतर देशांनाही इराणपासून दूर राहा असे संकेत दिले आहेत. या कराराबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, " हा करार एकदम एकांगी होता. तो कधीही करायला नको होता. त्याने शांतता प्रस्थापित झाली नाही आणि कधी होणारही नव्हती." इतकेच नव्हे तर इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सोडण्याचे दिलेले आश्वासन म्हणजे एक थापच आहे. या कराराला पुढे चालू ठेवल्याने मध्य-पूर्वेत शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीला लागली असती आणि इराणच्या अस्थिरता पसरवणाऱ्या वर्तनाला थांबवता आले नसते.अमेरिकेने इराणवर लादलेल्या नव्या बंधनांमुळे तेलाचे दर भडकण्यास सुरुवात झाली आहे. आधीच व्हेनेझुएलामधील अस्थिरता व घटलेले उत्पादन यामुळे तेलाचे दर वाढत आहेत. त्यातच ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे तेलाच्या दरांमध्ये आज 2 ते 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेलाचे दर प्रती बॅरल 76. 75वर गेले आहेत. नोव्हेंबर 2014 नंतर प्रथमच तेलाच्या दराने ही पातळी गाठली आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाCrude Oilखनिज तेलPetrolपेट्रोलDieselडिझेल