शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

US H1B Visa: '२२२जी' अंतर्गत एच१बी व्हिसा अर्ज नाकारला गेल्यास काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 11:07 IST

इमिग्रेशन अँड नॅशनलिटी कायद्याच्या (एनआयए) कलम २२१ (जी)  अंतर्गत व्हिसा अर्ज नाकारला जातो, त्याचा अर्थ मुलाखतीच्यावेळी व्हिसासाठीची पात्रता निश्चित करण्यात आलेली नाही असा होतो.

प्रश्न- मी एच१बी व्हिसा अर्जदार आहे. अधिकाऱ्यानं प्रशासकीय प्रक्रिया '२२१जी' अंतर्गत माझा अर्ज नाकारला. माझा व्हिसा रद्द झालाय की तो पेंडिंग आहे?

उत्तर: इमिग्रेशन अँड नॅशनलिटी कायद्याच्या (एनआयए) कलम २२१ (जी)  अंतर्गत व्हिसा अर्ज नाकारला जातो, त्याचा अर्थ मुलाखतीच्यावेळी व्हिसासाठीची पात्रता निश्चित करण्यात आलेली नाही असा होतो. व्हिसासाठीची पात्रता निश्चित झाल्यानंतर २२१ (जी) रद्द होऊ शकते.

२२१ (जी) रद्द होणं सर्वसाधारणपणे प्रशासकीय प्रक्रियेदरम्यान होतं. तीन कारणांमुळे ही वेळ येते: - दूतावासातील अधिकाऱ्याला अर्जदाराकडून अधिकची कागदपत्रं किंवा माहिती हवी असते.

- अर्जासोबत अधिकची माहिती गरजेची असते. पण ती अर्जदाराकडून नव्हे, तर स्रोतांच्या माध्यमातून हवी असते, किंवा

- व्हिसासाठीची पात्रता मुलाखतीवेळी निश्चित करता येत नाही आणि त्यासाठी पुढील प्रक्रिया गरजेची असते.

दूतावासातील मुलाखतीपूर्वी, अर्जदारानं एच १ बी अर्ज नीट वाचावा. अमेरिकेत त्याला मिळालेल्या कामाचा तपशील समजून घ्यावा. एच१बी अर्जाला मंजुरी मिळण्यासाठी अर्जदारानं यूएससीआयएसला दिलेली कागदपत्रं मुलाखतीवेळी आणावीत. मुलाखतीवेळी अर्जदारानं त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना खरी उत्तरं द्यावीत.

मुलाखतीवेळी खालील कागदपत्रं मागितली जाऊ शकतात: 

- याचिकाकर्ता आणि लाभार्थी यांच्यातील ऑफर लेटर किंवा एम्प्लॉयमेंट ऍग्रीमेंट

- याचिकाकर्ता आणि मिड-व्हेंडर(र्स) किंवा एन्ड क्लाएंट यांच्यात झालेले करार

- लाभार्थ्याच्या असाईनमेंटबद्दल खात्री देणारं एन्ड-क्लाएंटचं पत्र

- प्रकल्पाचं वर्णन करणारी तपशीलवार माहिती (मुख्यत्वे इन-हाऊस प्रकल्पांसाठी)

- लाभार्थ्याकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा संपूर्ण तपशील, त्यात वर्कसाईट्स आणि तारखांचा समावेश असावा. 

- आर्थिक कागदपत्रं, उदाहरणार्थ, याचिकाकर्त्यानं आयकर भरल्याची कागदपत्रं, वेतन अहवाल किंवा लाभार्थ्याचा डब्ल्यू-२ अर्ज, कर परतावा किंवा पे स्टेटमेंट्स

- लाभार्थ्याच्या शैक्षणिक पात्रतेचे पुरावे किंवा मागील कामाचा अनुभव दाखवणारी कागदपत्रं

प्रशासकीय प्रक्रिया व्हिसा अर्जदाराच्या वैयक्तिक कारणांमुळेदेखील प्रभावित होऊ शकते. कारण प्रत्येक केस वेगळी असते. त्यामुळे २२१जी अंतर्गत अर्ज नाकारण्याची वेगळी असू शकतात. त्यामुळे प्रक्रियेसाठी लागणारा कालावधीही वेगवेगळा असतो. तो काही दिवसांपासून अनेक आठवड्यांपर्यंत असू शकतो. मात्र केसच्या फॉलो-अपची गरज नसते. केसमध्ये पुढील प्रक्रिया करायची असते किंवा अधिक माहितीची गरज असते, तेव्हा दूतावासातून तुम्हाला संपर्क केला जातो. 

मार्गदर्शक तत्त्वं आणि नियमावलीत बदल होऊ शकतात ही बाब प्रवाशांनी लक्षात ठेवावी. प्रवासाबद्दलच्या नियमावलीशी संबंधित अप-टू-डेट माहितीसाठी travel.state.gov संकेतस्थळाला भेट द्या. भारताशी संबंधित नियमावलीसाठी in.usembassy.gov/covid-19-information/ संकेतस्थळ पाहा.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा