वॉशिंग्टनः जगभरात कोरोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनंही याला महारोगराई घोषित केलं आहे. या भयंकर रोगानं जगभरात आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतही 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीचं परीक्षण घेण्यास सुरुवात केली असून, सोमवारी पहिल्या व्यक्तीवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. चीनमधलं वुहान हे कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू असून, 141 देशांमध्ये व्हायरसनं हातपाय पसरले आहेत. विशेष म्हणजे चीनलाही या रोगावर निश्चित लस किंवा औषध विकसित करता आलेलं नाही. डॉ. जॅक्सन यांच्या मते, कोरोना व्हायरससारखी आपत्ती दूर ठेवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचं आहे. ओळख उघड न करण्याच्या अटीवर 45 कोरोनाबाधित रुग्णांना या प्रयोगासाठी निवडण्यात आलं असून, त्यांना टप्प्याटप्प्यानं ही लस देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी डॉक्टर घेत आहेत. सोमवारी एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. त्यानंतर आता आणखी तीन लोकांना ही लस देण्यात येणार आहे. या 45 लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या लसीचा सर्वांवर पडणाऱ्या प्रभावाचं निरीक्षण केलं जात आहे.
Coronavirus : अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीची घेतली चाचणी; 45 जणांवर प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 08:09 IST
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.
Coronavirus : अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीची घेतली चाचणी; 45 जणांवर प्रयोग
ठळक मुद्देजगभरात कोरोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनंही याला महारोगराई घोषित केलं आहे. या भयंकर रोगानं जगभरात आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतही 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीचं परीक्षण घेण्यास सुरुवात केली असून, सोमवारी पहिल्या व्यक्तीवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे.