शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 11:31 IST

अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वॉशिग्टन - अमेरिकेत मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात तणावाचे वातावरण दिसत आहे. अशात लोक स्वसंरक्षणासाठी बंदुका विकत घेत आहेत. बुंदूक विकत घेणाऱ्यांमध्ये 40 टक्के लोक असे आहेत, ज्यांनी आयुष्यात प्रथमच बंदूक हातात घेतली आहे. 

मार्चमध्ये 3.7 मिलियन, तर जूनमध्ये 3.9 मिलियन लोकांनी विकत घेतली बंदूक -अमेरिकेतील अधिकांश लोक बंदूक खरेदी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे लोक आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच बंदूक खरेदी करत आहेत आणि हे सर्व राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या वातावरणामुळे सुरू आहे. सप्टेंबरमधील एफबीआयच्या रेकॉर्डप्रमाणे बंदूक खरेदी करण्यासाठी बॅकग्राउंड क्लिअर दाखवणे आवश्यक आहे. मात्र मार्च महिन्यात 3.7 मिलियन आणि नंतर जूनमध्ये 3.9 मिलियन सप्टेंबरमध्ये 28.8 मिलियनपर्यंत बॅकग्राउंड तपासणीने गेल्या वर्षीचा 28.4 मिलियनचा आकडाही मागे टाकला आहे.

सिव्हिल वॉर होण्याची शक्यता दिसतेय - बंदूक व्यापारीबंदूक व्यापार संघ नॅशनल स्पोर्ट्स शूटिंग फाउंडेशननुसार, 40 टक्के ग्राहकांनी पहिल्यांदाच बंदूक विकत घेतली आहे. यात मोठी संख्या असणाऱ्या राज्यांत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही आहेत. तसेच 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत बॅकग्राउंड चेक करून बंदूक विकत घेणाऱ्यांची एकूण संख्या 27.5 मिलियन एवढी होती. बेन्सन म्हणतात, मला बंदुकांचा काही छंद नाही. मात्र, मला माझा अधिकार दाखवणे आवश्यक आहे. निवडणूक निकालासंदर्भात लोकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. देशातील बंदूक व्यापाऱ्यांना सिव्हिल वॉर होते, की काय अशी शक्यता वाटत आहे. 

अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :US ElectionAmerica ElectionAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पElectionनिवडणूक