शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी भारतासाठी सर्वोत्कृष्ट, पुन्हा निवडणूक जिंकावी अशी इच्छा"; हॉलिवूड सिंगर झाली फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 12:16 IST

नरेंद्र मोदी हे भारत आणि भारत-अमेरिका संबंधांसाठी सर्वोत्तम नेते आहेत असं आफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि सिंगर मेरी मिलबेनने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि भारत-अमेरिका संबंधांसाठी सर्वोत्तम नेते आहेत असं आफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि सिंगर मेरी मिलबेनने म्हटलं आहे. अमेरिकेतील अनेकांना पंतप्रधानांनी पुन्हा निवडणूक जिंकावी, जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध आणखी घट्ट होऊ शकतील. त्यांना असं वाटतं की, पंतप्रधान मोदी निवडणुका जिंकण्याच्या मार्गावर आहेत असंही मेरी मिलबेनने म्हटलं आहे. 

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मेरी मिलबेन म्हणाली, मी तुम्हाला सांगू इच्छिते की, अमेरिकेत पंतप्रधानांना नक्कीच खूप पाठिंबा आहे. माझा विश्वास आहे की, अनेकांना पंतप्रधान पुन्हा निवडून आलेले पाहायचे आहेत कारण ते भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत. मेरी मिलबेनचे भारतात खूप मोठे चाहते आहेत. तिने भारताचं राष्ट्रगीत 'जन गण मन' आणि 'ओम जय जगदीश हरे' हे गाणंही गायलं आहे.

भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन

मेरी मिलबेन म्हणाली की, मला विश्वास आहे की हा निवडणुकीचा काळ अमेरिका, भारत आणि जगासाठी सर्वात महत्त्वाचा काळ असणार आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे. मिलबेनने भारतीयांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. मी भारतातील माझ्या सर्व प्रिय कुटुंबीयांना या निवडणुकीसाठी मतदान करावं म्हणून प्रोत्साहित करते, जेणेकरून तुमचा आवाज ऐकू येईल असं म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदी हे भारतासाठी सर्वोत्तम नेते - मिलबेन

हे गुपित नाही, संपूर्ण भारताला माहीत आहे की मी पंतप्रधान मोदींची मोठी समर्थक आहे आणि मला वाटतं की ते भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत. भारत-अमेरिका संबंधांसाठी ते एक चांगले नेते आहेत. ही ती वेळ आहे जेव्हा नागरिकांनी आवाज उठवण्याची, महत्त्वाच्या गोष्टी शेअर करण्याची, धोरणांची जी आपल्या देशांसाठी आणि आपल्या नेत्यांसाठी महत्त्वाची आहे. आपल्या देशात बदल घडवून आणण्याची ताकद आपल्यात आहे असंही मिलबेनने म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाIndiaभारत