शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टेस्ला कार तलावात बुडून झाला होता अब्जाधीश महिलेचा मृत्यू, आता झाला महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 12:46 IST

फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या प्रकाराबद्दल नवी माहिती समोर आली आहे

mitch mcconnell, angela chao, tesla car:  यूएस सिनेट रिपब्लिकन नेते मिच मॅककोनेल यांच्या मेहुणीचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. अँजेला चाओ असे त्यांचे नाव असून त्या ५० वर्षांच्या होत्या. शिपिंग फर्म फॉरमोस्ट ग्रुपच्या त्या सीईओपदी कार्यरत होत्या. अमेरिकेच्या दक्षिणेकडील टेक्सास राज्यातील एका तलावात त्या आपल्या टेस्ला कारसह पडल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना फेब्रुवारी 2024 मध्ये घडली होती, ज्याबाबत या महिन्यात काही खुलासे झाले आहेत.

मृत्यूबाबत नवा महत्त्वाचा खुलासा

एका माहितीनुसार, वीकेंडला अँजेलाचा नवरा आणि अमेरिकन व्हेंचर कॅपिटलिस्ट जिम ब्रेयर कामात व्यस्त असताना, ती तिच्या मित्रांसोबत चायनीज न्यू इयर साजरे करत होती. तेथून परतत असताना एका ठिकाणी तिला तीन वळणे दिसली आणि त्यानंतर कार ड्रायव्हिंग मोडमध्ये ठेवण्याऐवजी तिने रिव्हर्स मोडमध्ये ठेवली. रिव्हर्स मोड चालू करताच कार मागील बाजूला जाऊन तलावात पडली.

२४ मिनिटांनी बचाव पथक दाखल

जेव्हा कार तलावात बुडू लागली तेव्हा अँजेलाने तिच्या मित्राला फोन करून मदतीसाठी बोलावले. माहिती मिळताच मित्र घटनास्थळी पोहोचला. त्याने बचाव प्राधिकरणाला माहिती दिली आणि ते येण्यापूर्वी त्याने अँजेलाला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. त्याने सांगितले की, टेस्लाच्या कारची काच इतकी मजबूत होती की खूप प्रयत्न करूनही ती तोडण्यात अपयश आले. या घटनेच्या वृत्तात सांगण्यात आले की, बचाव अधिकारी माहिती मिळाल्यानंतर २४ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले.

४३ मिनिटांनी अँजेलाला मृत घोषित केले

अँजेलाला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. कार पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने टो ट्रकची मदत घेण्यात आली, मात्र ट्रकची केबल तुटल्यामुळे ती गाडीपर्यंत पोहोचू शकली नाही. काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की ट्रकच्या चालकाला विजेचा धक्का बसण्याची भीती होती. खूप प्रयत्नांनंतर, कार बाहेर काढण्यात आली, त्यानंतर तिचा दरवाजा कसाबसा उघडला. अँजेला कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नव्हती. अखेर ४३ मिनिटांच्या प्रयत्नानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूTeslaटेस्लाAccidentअपघातAmericaअमेरिकाUSअमेरिका