अमेरिकेतील शाळेत गोळीबार, दोन विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी

By Admin | Updated: September 29, 2016 01:34 IST2016-09-29T01:24:35+5:302016-09-29T01:34:48+5:30

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे असलेल्या एका एका प्राथमिक शाळेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाले आहेत.

US school teacher fired, two teachers injured teachers | अमेरिकेतील शाळेत गोळीबार, दोन विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी

अमेरिकेतील शाळेत गोळीबार, दोन विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी

ऑनलाइन लोकमत
द.कॅरोलिना, दि. 29 - अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे असलेल्या एका प्राथमिक शाळेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास दक्षिण कॅरोलिना प्राथमिक शाळेत हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांसह एक शिक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गोळीबार करणा-या संशयीत अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली असून गोळीबार करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. या शाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थी आहेत. 
तसेच, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
 

Web Title: US school teacher fired, two teachers injured teachers