शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

रशिया-युक्रेन यु्द्ध थांबणार? पुतिन चर्चेसाठी तयार, पण झेलेन्स्कींचा स्पष्ट नकार; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:16 IST

US-Russian Meeting in Saudi Arabia: रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात आज सौदी अरेबियामध्ये रशियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली.

Ukraine President on US-Russian Diplomats Meeting : रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दोन वर्षाहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. पण, आता हे युद्ध संपण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मंगळवारी (18 फेब्रुवारी) सौदी अरेबियातील रियाध येथे रशिया आणि अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. विशेष म्हणजे, गरज भासल्यास रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे प्रमुख वोलोडिमिर झेलेन्स्कींना भेटण्यास तयार आहेत.

युक्रेनसंदर्भातील चर्चेतून युक्रेन गायब

सौदी अरेबियातील रियाधमध्ये रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात रशियन आणि अमेरिकन मुत्सद्दींमध्ये चर्चा झाली, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चर्चेत युक्रेनच्या एकाही अधिकाऱ्याचा समावेश नव्हता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या बैठकीवर जाहीर आक्षेप घेतला. ते म्हणाले, युक्रेनच्या सहभागाशिवाय युक्रेनसाठी केलेला कोणताही करार किंवा चर्चा आम्हाला मान्य नाही. 

दरम्यान, झेलेन्स्की सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. मात्र त्यांचा दौरा रशियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या एक दिवसानंतर होणार आहे. पण, या दौऱ्यात ते कोणत्याही रशियन किंवा अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटणार नसल्याचे युक्रेनच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. 

पुतिन अन् झेलेन्स्कींशी ट्रम्पची चर्चा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात शांतता चर्चेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि झेलेन्स्की या दोघांशीही फोनवर चर्चा केली आहे. मात्र, युक्रेनकडे दुर्लक्ष करून ट्रम्प यांनी प्रथम पुतिन यांच्याशी चर्चा करून युद्ध संपवण्याची चर्चा केल्याने दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. ट्रम्प, झेलेन्स्कीवर सुरक्षेच्या बदल्यात युक्रेनमधील 50 टक्के खनिजे अमेरिकेला देण्यासाठी दबाव आणत आहेत, ज्याला झेलेन्स्की यांनी सहमती दर्शवली आहे.

बैठकीदरम्यान रशिया-युक्रेन हल्ले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकन आणि रशियन अधिकारी सौदी अरेबियात बैठक घेत आहेत. मात्र यादरम्यानही दोन्ही देशांमध्ये एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. रशियाने कीववर ड्रोनने हल्ला केला आहे. युक्रेनच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने युक्रेनवर रात्रभर 176 ड्रोन हल्ले केले, त्यापैकी बहुतांश नष्ट झाले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाsaudi arabiaसौदी अरेबिया