अमेरिका करणार बुधवारी रणनीतीचा खुलासा
By Admin | Updated: September 9, 2014 04:27 IST2014-09-09T04:27:21+5:302014-09-09T04:27:21+5:30
आयएसआयएसने निर्माण केलेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आखलेल्या नीतीबाबत स्पष्टीकरण बुधवारी करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी येथे सांगितले

अमेरिका करणार बुधवारी रणनीतीचा खुलासा
वॉशिंग्टन: आयएसआयएसने निर्माण केलेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आखलेल्या नीतीबाबत स्पष्टीकरण बुधवारी करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी येथे सांगितले आहे. आयएसआयएसने इराक व सिरियाच्या मोठय़ा प्रदेशावर ताबा मिळविला असून अलीकडेच दोन अमेरिकन पत्रकारांनाही ठार केले आहे.
प्रसिद्धीमाध्यमांसोबत बोलताना ओबामा यांनी, यासंदर्भात काय धोरणे आखली आहेत हे बुधवारी जाहीर केले जाईल. मात्र अमेरिकेच्या सैनिकांबाबत काही घोषणा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे इराक युद्धासारखे नसून दहशतवादविरोधी अभियानाप्रमाणे आहे. ज्याला आम्ही गेल्या सहा-सात वर्षांपासून राबवित आहोत. आयएसआयएससोबत लढा देण्याची बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर समजली जाऊ शकते असेही मत ओबामांनी यावेळी व्यक्त केले.