शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 03:40 IST

वर्षभरात अमेरिका संघटनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी ६ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.

वॉशिंग्टन : कोरोनाच्या जागतिक महामारीत सर्वाधिक जिवितहानी झालेल्या अमेरिकेने अखेर संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेमधून (डब्ल्यूएचओ) बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. संघटनेतून बाहेर पडण्याचा इशारा अमेरिकेने यापूर्वीच दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी या संदर्भात डब्ल्यूएचओला एक नोटीस पाठवली आहे. डब्ल्यूएचओचे चीनशी साटेलोटे असून त्यामुळेच कोरोनाला जागतिक महामारी जाहीर करण्यास संघटनेने दिरंगाई केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.कोरोनाचा उद्रेक चीनच्या वुहान शहरातूनच झाला, मात्र त्याची माहिती संघटनेने दडवून ठेवली त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करता आल्या नाहीत. परिणामी हा विषाणू जगभर वेगाने पसरला व आतापर्यंत सर्वाधिक बळी अमेरिकेत गेले आहेत. ट्रम्प प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करुनही हा संसर्ग रोखता आला नाही. अमेरिकेने डब्ल्यूएचओची ४०० दशलक्ष डॉलरची मदत थांबवण्याबाबतची पाठवलेली नोटीस मिळाल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षाच्या प्रवक्त्याने त्यास दुजोरा दिला आहे. संघटनेच्या जिनिव्हा येथील मुख्य कार्यालयास नोटीस मिळाली असून, वर्षभरात अमेरिका संघटनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी ६ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.मेपासूनच ट्रम्प व डब्ल्यूएचओ यांच्यात मतभेद पराकोटीला गेले होते. ही संघटना चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर संघटनेची ४०० दशलक्ष डॉलरची मदत रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला होता....तर अमेरिका पुन्हा सहभागी : ज्यो बिडेनट्रम्प यांनी डब्ल्यूएचओतून बाहेर पडण्याचे सुतोवाच केले असले तरी आपण निवडून येताच अमेरिका पुन्हा संघटनेत सहभागी होईल, असेही ज्यो बिडेन यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे स्थान या संघटनेत महत्त्वाचे आहे, अगदी प्रारंभी म्हणजे १९४८ मध्ये ही संघटना स्थापन झाल्यानंतर वर्षभरात काही मतभेदामुळे अमेरिका बाहेर पडली होती. नंतर काही काळात पुन्हा अमेरिकेचा संघटनेत सक्रीय प्रवेश झाला.

टॅग्स :United StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना