शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 13:52 IST

आपण 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत जिंकलो तर नवीन टॅब ओपण केल्यासंदर्भात Google विरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत लवकरच राष्ट्रपतीपदाची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प देखील मैदानात आहेत. ट्रम्प हे सातत्याने चर्चेत राहणारे नेते आहेत. आता, आपण 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत जिंकलो तर नवीन टॅब ओपण केल्यासंदर्भात Google विरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांचा दावा आहे की, कंपनी केवळ त्यांच्या बद्दलच "वाईट गोष्टी" प्रदर्शित करते. मात्र, त्यांनी ट्रुथ सोशलवरील गुगल संदर्भातील त्यांच्या दाव्यासंदर्भात कसलाही पुरावा दिलेला नाही.

काय म्हणाले ट्म्प? -ट्रम्प म्हणाले, "गुगलने अवैध पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पसंदर्भात केवळ वाईट गोष्टीच प्रदर्शित करण्यासंदर्भात एका सिस्टिमचा वापर केला आहे. याच वेळी, डेमोक्रॅटिक फक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या संदर्भात चांगल्या गोष्टी करत आहेत." 

ट्रम्प म्हणाले, "ही एक बेकायदेशीर कृती आहे आणि न्याय विभागाने या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला चालवणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास, मी निवडणूक जिंकल्यानंतर आणि अमेरिकेचा राष्ट्रपती झाल्यानंतर, आपल्या देशाच्या कायद्यांतर्गत कमाल पातळीवर त्याच्याविरोधात खटला चालवण्याची विनंती करेन."

टम्प यांनी 2029 मध्येही केले होते आरोप - वॉशिंग्टन पोस्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 मध्येही गूगलसंदर्भात असाच दावा केला होता. त्यांनी ट्विटरवर (आताचे एक्स) पोस्ट करत, गूगलने 2016 च्या राष्ट्रपती निवडणुकीत आपल्यासंदर्भात निगेटिव्ह न्यूजला सपोर्ट केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी गूगलने त्यांचा आरोप फोटाळून लावला होता. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाgoogleगुगलElectionनिवडणूक 2024