us president donald trump signed an executive order for banning transactions with 8 Chinese software | चीनला मोठा धक्का! ८ सॉफ्टवेअरचे व्यवहार रोखले; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

चीनला मोठा धक्का! ८ सॉफ्टवेअरचे व्यवहार रोखले; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

ठळक मुद्देचीनच्या आठ सॉफ्टवेअरच्या व्यवहारांवर प्रतिबंध घालण्याचा निर्णयअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या या सॉफ्टवेअरमध्ये अलीपे, व्हिचॅटपे यांचा समावेश

न्यूयॉर्क : अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ चिनी सॉफ्टवेअरची देवाण-घेवाणीवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अलीबाबा अँट ग्रुपचा समावेश आहे. 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या आठ सॉफ्टवेअरवर प्रतिबंध घालण्याऱ्या एका कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. यामध्ये व्हिचॅटपे, अलीबाबा अँट ग्रुपचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी चीनशी असलेला तणाव वाढला आहे, अशी कबुली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी बोलताना दिली. 

काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चिनी अॅपवर बंदी घातली होती. तसेच ऑगस्ट २०२० मध्ये टिकटॉक आणि व्हिचॅट यांसारख्या अॅपवर प्रतिबंध घालण्याचा आदेश काढण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर अमेरिकी कर्मचाऱ्यांनीही टिकटॉकचा वापर करू नये, असा ठराव अमेरिकन सीनेटने एकमताने पारित केला होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव चिनी अॅपवर बंदी घालत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावेळी सांगितले होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: us president donald trump signed an executive order for banning transactions with 8 Chinese software

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.