Donald Trump on Hormuz Strait: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम सुटला. होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या ताब्यातून मोकळी करण्यासाठी ट्रम्प यांनी जगातील काही देशांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले, पण त्या देशांकडून आलेल्या नकारात्मक उत्तराने ते खवळले. ट्रम्प यांनी 'जे मदत करणार नाही त्यांना लक्षात ठेवू', असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ज्यांना मी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे; जे मदत करतील त्यांना आणि जे मदत करणार नाही, त्यांना आम्ही लक्षात ठेवू.
ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटेन या देशांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. रविवारी एअर फोर्स वन विमानातून प्रवासात असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले होते. अनेक वर्षांपासून अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनी सांभाळत आली आहे. अमेरिकेला होर्मुझची गरज नाही, मात्र काही देशांना आहे, असे ट्रम्प म्हणाले.
आता युद्ध संपले आहे आणि इराणची...
ट्रम्प म्हणाले की, 'आता युद्ध संपले आहे आणि त्यांची (इराण) लष्करी ताकद संपत आली आहे. मला वाटते की, दुसऱ्या देशांनीही या युद्धात सहभागी होणं चांगली बाब असेल.'
'दोन आठवड्यांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान दोन विमानवाहू नौका होर्मुझमध्ये पाठवण्यास कचरत होते. आता जेव्हा आम्ही हे बऱ्याच प्रमाणात उद्ध्वस्त केले आहे. तेव्हा ते म्हणाले की आम्ही आमच्या विमानवाहू नौका पाठवू इच्छितो. मी त्यांना म्हणालो की, युद्ध जिंकल्यानंतर मला त्यांची गरज नाहीये.'
आम्ही हे लक्षात ठेवू
ट्रम्प म्हणाले की, 'मला त्यांची गरज तेव्हा होती, जेव्हा आम्ही हे युद्ध सुरू करत होतो. आम्हाला पाठिंबा मिळो अथवा न मिळो, मी इतकंच सांगू इच्छितो आणि मी त्यांनाही म्हणालो की, आम्ही हे लक्षात ठेवू.'
इराणला तडजोडीची चर्चा करायची आहे
डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला की इराणला तडजोडीबद्दल चर्चा करण्याची इच्छा आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'तडजोड करण्याची इराणला घाई झाली आहे. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत, पण मला वाटत नाही की, ते लगेच तयार होतील. पण, ते निर्णयाच्या खूपच जवळ पोहोचले आहेत.'
'आम्ही जर आता त्यांना सोडून दिलं, तर त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी १० वर्षे लागतील. मोजतबा खामेनेई यांच्या समर्थनार्थ एका चौकात जमलेल्या लोकांची छायाचित्रे, आणि यूएसएस अब्राहम लिंकन युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यांची छायाचित्रे ही एआयच्या माध्यमातून बनलेली आहेत', असा दावा करत त्यांनी हल्ल्याचे वृत्त फेटाळले.
Web Summary : Trump urged countries like China, France, and Britain to send warships to the Hormuz Strait. Angered by their reluctance, he warned he would remember those who didn't help, hinting at potential repercussions. He also claimed Iran wants to negotiate.
Web Summary : ट्रंप ने चीन, फ्रांस और ब्रिटेन जैसे देशों से होर्मुज जलडमरूमध्य में युद्धपोत भेजने का आग्रह किया। उनकी अनिच्छा से नाराज होकर, उन्होंने चेतावनी दी कि वह उन लोगों को याद रखेंगे जिन्होंने मदद नहीं की, संभावित नतीजों का संकेत दिया। उन्होंने यह भी दावा किया कि ईरान बातचीत करना चाहता है।