भारताचा मित्र देश असलेल्या अमेरिकेने आता पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. एकीकडे भारतावर २५% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी आधीच सगळ्यांना मोठा झटका दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानशी तेलाचा मोठा करार करत त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने पाकिस्तानला त्यांचे तेल साठे विकसित करण्यास मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. यासोबतच, पाकिस्तान कधीतरी भारताला तेल विकेल, असे वक्तव्य देखील त्यांनी केले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट पोस्ट केली आहे. यात ते म्हणाले की, "आम्ही नुकताच पाकिस्तानसोबत एक करार केला आहे, ज्याअंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका त्यांचे प्रचंड तेल साठे विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील. आम्ही या भागीदारीचे नेतृत्व करणारी तेल कंपनी निवडण्याच्या प्रक्रियेत आहोत. कुणास ठाऊक, कदाचित ते कधीतरी भारताला तेल विकतील!"
व्हाईट हाऊस व्यापार करारांवर काम करण्यात व्यस्त!अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही पोस्ट भारतावर २५ टक्के कर आणि रशियन लष्करी उपकरणे आणि ऊर्जा खरेदीवर अतिरिक्त दंडाची घोषणा केल्यानंतर काही तासांतच समोर आली आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, व्हाईट हाऊस सध्या व्यापार करारांवर काम करण्यात खूप व्यस्त आहे. मी अनेक देशांच्या नेत्यांशी बोललो आहे आणि ते सगळेच अमेरिकेला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प पुढे म्हणाले की, "मी आज दुपारी दक्षिण कोरियाच्या व्यापारी प्रतिनिधी मंडळाला भेटणार आहे. दक्षिण कोरिया सध्या २५% कर आकारत आहे, परंतु त्यांच्याकडे तो कर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव काय आहे हे जाणून घेण्यास मला रस असेल."
अनेक देश शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव देत आहेत!त्यांनी असेही म्हटले की, सध्या अनेक देश अमेरिकेला टॅरिफ कपात करण्याचा प्रस्ताव देत आहेत. या सर्व गोष्टींमुळे आपली व्यापार तूट मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. योग्य वेळी संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला जाईल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.