अमेरिका नौदलातील ‘सील’ कमांडो सोमालियात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 03:15 IST2017-05-06T03:15:54+5:302017-05-06T03:15:54+5:30
अमेरिकेच्या नौदलातील ‘सील’ (समुद्रात, हवेत व जमिनीवरील युद्धकौशल्यात तरबेज) कमांडो सोमालियात अल-

अमेरिका नौदलातील ‘सील’ कमांडो सोमालियात ठार
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - अमेरिकेच्या नौदलातील ‘सील’ (समुद्रात, हवेत व जमिनीवरील युद्धकौशल्यात तरबेज) कमांडो सोमालियात अल-शबाब मोहिमेत ठार झाल्याच्या वृत्तास अमेरिकेच्या आफ्रिका कमांडद्वारे शुक्रवारी दुजोरा देण्यात आला. सोमालियातील चकमकीत १९९३ नंतर प्रथमच ‘सील’ कमांडो धारातीर्थी पडला, हे विशेष. सोमालिया नॅशनल आर्मीसोबत अमेरिकन सैन्य दल मोगादिशूजवळ मोहिमेवर असताना दहशतवाद्यांनी गुरुवारी अचानक हल्ला केला होता.