शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 08:07 IST

जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून लडाखच्या LACवर चीन आणि भारताचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर भारतानंही चीनला जशास तसे उत्तर देण्याचं रणनीती आखली आहे. गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या LACवर चीन आणि भारताचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर भारतानंही चीनला जशास तसे उत्तर देण्याचं रणनीती आखली आहे. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे.

वॉशिंग्टनः गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या LACवर चीन आणि भारताचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर भारतानंही चीनला जशास तसे उत्तर देण्याचं रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे चीनविरोधातील या संघर्षांत अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आलेले आहेत. चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. त्यांच्या भूमीत चीन सातत्यानं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा देशांनी आघाडी उघडली असून, भारताला समर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनीही भारत-चीन वादात सावध पवित्रा घेतला होता. पण आता अमेरिकेनं उघड उघड भारताला समर्थन दिलं आहे. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे. चीनला आशियात दादागिरी करू देणार नसल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसच्या या घोषणेच्या थोड्या वेळानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर निशाणा साधला आहे.  चीनमुळे अमेरिका आणि उर्वरित जगाला खूप नुकसान सोसावं लागलं, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात फॉक्स न्यूजला सांगितले की, आम्ही चीन किंवा इतर कोणत्याही देशाला सर्वात शक्तिशाली किंवा प्रभावी शक्ती म्हणून स्वीकारणार नाही, हा संदेश स्पष्ट आहे. अमेरिकेच्या नौदलाने या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन विमानवाहू जहाज तैनात केल्यानंतर अधिका-यांनी हे विधान केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट केले की, "चीनमुळे अमेरिका आणि उर्वरित जगाचे प्रचंड नुकसान झाले." कोरोना विषाणूच्या साथीमुळे अमेरिका, संपूर्ण युरोप आणि भारतासह जगातील इतर देशांची अर्थव्यवस्था जवळजवळ ठप्प झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात चीनने कोरोनाविषयी माहिती का दिली नाही आणि विषाणू जगभर का पसरवू दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन सैन्यमिडोज यांनी सांगितले की, अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात पाठवल्या आहेत. अमेरिका ही जगातील सर्वोत्तम शक्ती आहे हे जगाला ठाऊक असेल हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. दक्षिण चीन सागर आणि पूर्व चीन समुद्रात प्रादेशिक वाद उकरून काढत असतो. चीन जवळजवळ संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर दावा करतो. व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांच्या भागावर हक्क सांगतो, असंही मिडोज म्हणाल आहेत. मिडोज यांनी भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णय योग्य असल्याचा उल्लेख केला आहे. हेही वाचा

जगात टाळेबंदी; पोस्टात मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास असलेल्यांनी आजच अर्ज करा

चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावAmericaअमेरिकाIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प