शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खामेनेईंच्या हत्येनंतर पाकिस्तानात अमेरिकेविरोधात उद्रेक, आंदोलकांचा दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 14:50 IST

US Military Firing On Pakistani Protesters: इराणवर करण्यात आलेला हल्ला आणि खामनेई यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली असून, आक्रमक आंदोलकांनी आज अमेरिकेच्या कराची येथील  दूतावासावर हल्ला केला. आंदोलकांनी दूतावासामध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली.

शनिवारपासून अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात  सुरू केलेल्या कारवाईदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामनेई हे मारले गेले आहेत. दरम्यान, इराणवर करण्यात आलेला हल्ला आणि खामनेई यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली असून, आक्रमक आंदोलकांनी आज अमेरिकेच्या कराची येथील  दूतावासावर हल्ला केला. आंदोलकांनी दूतावासामध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली. दरम्यान, आंदोलकांना हुसकावून लावून परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि अमेरिकन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ८ आंदोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते खामनेई यांचा अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यानंतर पाकिस्तानमध्ये संतापाचा उद्रेक झाला. तसेच लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, कराचीमधील एम.टी.खान रोड येथे असेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासमोर आंदोलक गोळा झाले. तसेच आंदोलकांनी खामनेई आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात आल्याविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.

याचदरम्यान, परिस्थिती चिघळली आणि आंदोलकांनी अमेरिकन दूतावासाच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. काही आंदोलक दूतावासात घुसले आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. दरम्यान, जमावाला नियंत्रित करण्यासाठी तिथे असलेले पोलीस आणि अमेरिकन सुरक्षा दलांनी अश्रुधुराचे गोळे सोडले. त्यानंतर थेट गोळीबार गेला. 

या गोळीबारात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. तसेत जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर दूतावासाची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Khamenei's Death Sparks Anti-US Protests, Embassy Attacked in Pakistan

Web Summary : Following Khamenei's death, anti-US protests erupted in Pakistan. Demonstrators attacked the Karachi embassy, resulting in clashes with security forces. Eight protesters died, and many were injured during the unrest. Security has been heightened.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानUnited StatesअमेरिकाIranइराणAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई