शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अमेरिकेला जे जमलं नाही, ते भारतानं करून दाखवलं; वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 11:03 IST

अमेरिकन सैन्य २ दशकांनंतर मायदेशी परतलं; अफगाणिस्तानसोबत श्वानांनादेखील अमेरिकेनं सोडलं वाऱ्यावर

काबूल/वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतलं आहे. अफगाणिस्तानात शांतता नांदावी यासाठी अमेरिकन सैन्य दोन दशकं तिथे तळ ठोकून होतं. २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या भूमीवर उतरलेलं अमेरिकन सैन्य आता मायदेशी परतलं. मात्र या दोन दशकांत अफगाणिस्तानातील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. तालिबाननं देशावर कब्जा केला आहे. त्यामुळे अमेरिकेनं २० वर्षांत नेमकं काय साधलं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती भयावह आहे. या परिस्थितीत अफगाणी जनतेला सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या अमेरिकेवर सडकून टीका होत आहे. त्यातच आता अमेरिका आणखी एका गोष्टीवरून अमेरिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

३१ ऑगस्टपर्यंत मायदेशी निघून जा, अन्यथा परिणाम भोगा, असा इशारा तालिबाननं अमेरिकेला दिला होता. त्यानंतर अमेरिकेन सैनिकांनी माघारी परतण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे अमेरिकेनं त्यांच्यासोबत असलेलं श्वानपथक स्वत:सोबत नेलं. अफगाणिस्तानातल्या मोहिमांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या श्वानांना सैनिक मायदेशी घेऊन गेले नाहीत. अमेरिकन सैन्याच्या मोहिमांमध्ये साथ देणाऱ्या या श्वानांचा फोटो आता व्हायरल झाला आहे. त्यात हे श्वान पिंजऱ्यांमध्ये दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला भारतानं आपल्या दूतावासातल्या श्वानांना मायदेशी आणलं आहे. काबूलमधील दूतावासात तीन श्वान होते. त्या तिघांना भारतीय कर्मचाऱ्यांनी सुखरुप मायदेशी आणलं. 

सेवेत असलेल्या ४६ श्वानांसह १३० प्राणी वाऱ्यावरडेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानात तळ ठोकून असलेल्या अमेरिकन सैन्याकडे ४६ श्वानांसह एकूण १३० प्राणी होते. या सगळ्यांना अमेरिकन सैन्यानं तिथेच ठेवलं आणि स्वत: मायदेशी निघून आले. पण पेंटागॉननं या वृत्ताचा इन्कार केला आहे. अमेरिकन सैन्यानं त्यांच्या सेवेत असलेल्या कोणत्याही श्वानाला काबूलमध्ये सोडलेलं नाही, असं पेंटागॉनचे प्रेस सचिव जॉन किर्बी यांनी सांगितलं. व्हायरल झालेले फोटो अमेरिकन मॅक्सवेल-जोन्स यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या काबूल स्मॉल ऍनिमल रेस्क्यू चॅरिटीचे आहेत. हे श्वान अमेरिकन सैन्याच्या देखरेखीखाली नव्हते, असं किर्बी म्हणाले.

भारतीय कर्मचाऱ्यांकडून श्वानांची सुटकाआपल्या सेवेत असलेल्या श्वानांना अमेरिकन सैन्यानं वाऱ्यावर सोडलं असताना दुसरीकडे भारतानं मात्र दूतावासात सेवा बजावणाऱ्या श्वानांची सुखरुप सुटका केली. काबूलमधील भारतीय दूतावासात तीन श्वान सेवा द्यायचे. माया, रुबी आणि बॉबी अशी त्यांची नावं. दूतावासात तैनात असलेल्या इंडो तिबेटियन सीमा पोलीस (आयटीबीपी) दलातील कर्मचाऱ्यांची ज्यावेळी काबूलमधून सुटका करण्यात आली, त्याचवेळी भारतीय हवाई दलानं या तिन्ही कुत्र्यांची सुखरुप सुटका केली.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान