शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
2
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
3
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
4
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
5
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
6
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
7
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
8
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
9
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
10
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
11
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
12
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
13
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
14
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
15
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
16
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
17
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
18
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
19
प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा
20
व्हेनेझुएलावर ताबा, राष्ट्राध्यक्षांवर चालणार खटला; देशाची व्यवस्था तात्पुरती अमेरिकेच्या ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचा मोर्चा आता क्यूबाकडे? परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची उघड धमकी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:26 IST

US Marco Rubio Cuba Warning : अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी क्यूबाच्या सरकारला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. व्हेनेझुएलातील मादुरोच्या अटकेनंतर आता क्यूबा अमेरिकेच्या रडारवर आहे का? वाचा सविस्तर.

वॉशिंग्टन: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैन्याने अटक केल्यानंतर आता दक्षिण अमेरिकेतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी क्यूबाच्या नेत्यांना थेट इशारा दिला असून, "जर मी हवानामध्ये (क्यूबाची राजधानी) सरकारमध्ये असतो, तर आता मला नक्कीच चिंता वाटली असती," असे खळबळजनक विधान केले आहे.

मार्को रुबिओ यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, क्यूबा सध्या पूर्णपणे कोलमडलेल्या अवस्थेत आहे. ते म्हणाले, "क्यूबा हा एक आपत्तीजनक देश आहे, जो अकार्यक्षम आणि वृद्ध व्यक्तींकडून चालवला जात आहे. तिथे अर्थव्यवस्था शिल्लक नाही." मादुरो यांना संरक्षण देणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमध्ये आणि त्यांच्या गुप्तचर संस्थेत मोठ्या प्रमाणावर क्यूबन नागरिक भरलेले होते, असा दावाही रुबिओ यांनी केला आहे.

'व्हेनेझुएलाला क्यूबापासून स्वातंत्र्य हवे' रुबिओ यांच्या मते, व्हेनेझुएलाची सर्वात मोठी समस्या ही होती की तो देश एक प्रकारे क्यूबाची वसाहत बनला होता. आता मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाला खऱ्या अर्थाने क्यूबाच्या प्रभावापासून स्वातंत्र्य मिळवण्याची गरज आहे. क्यूबाने व्हेनेझुएलाच्या सुरक्षेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता, जो आता अमेरिकेने मोडीत काढला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही क्यूबाला 'अयशस्वी राष्ट्र' म्हटले आहे. क्यूबातील कम्युनिस्ट प्रणालीमुळे तिथल्या जनतेने अनेक दशके दुःख सोसले असून, आता तिथल्या परिस्थितीत बदल करण्याची वेळ आली असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिका केवळ क्यूबातील जनतेलाच नाही, तर तिथून परागंदा होऊन अमेरिकेत राहणाऱ्या लोकांनाही मदत करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : After Venezuela, US turns to Cuba? Rubio issues threat.

Web Summary : Following Venezuela, US eyes Cuba. Rubio warns Cuba leaders, citing its failing state and influence in Venezuela. Trump echoes, calling Cuba a 'failed nation' needing change.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प