शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कमाल! ब्रेन डेड व्यक्तीला लावली डुकराची किडनी, अमेरिकन डॉक्टरांनी केला मोठा 'चमत्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 12:26 IST

हे ऑपरेशन यूनिव्हर्सिटी ऑफ अलबामामध्ये करण्यात आलं. याआधी डॉक्टरांनी डुकराचं हृदय मनुष्यात यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केलं होतं.

अमेरिकन (America) डॉक्टरांनी पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. त्यांनी मेडिकल इतिहासात पहिल्यांदाच जेनेटिकली मॉडिफाइड डुकराच्या दोन्ही किडनी (Genetically-Modified Pig Kidneys) एका ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सप्लांट केल्या आहेत. हे ऑपरेशन यूनिव्हर्सिटी ऑफ अलबामामध्ये करण्यात आलं. याआधी डॉक्टरांनी डुकराचं हृदय मनुष्यात यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केलं होतं.

काम करत आहेत दोन्ही किडनी

WION मध्ये प्रकाशित  एका वृत्तानुसार, ५७ वर्षीय जिम पार्सन्सचा गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये एक अपघात झाला होता. यानंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा पार्सन्स परिवारासोबत ऑपरेशनबाबत चर्चा केली तर ते तयार झाले. यानंतर रूग्णाला डुकराच्या दोन्ही किडनी लावण्यात आल्या. असं सांगितलं जात आहे की, किडन्यांनी ट्रान्सप्लांटनंतर लगेच योग्य प्रकारे काम सुरू केलं आहे.

याआधीही केली होती कमाल

याआधी डॉक्टरांच्या एका टीमने ५७ वर्षीय व्यक्तीत जेनेटिकली मॉडफाइड डुकराचं हृदय यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केलं होतं. मेडिकल इतिहासात पहिल्यांदाच असं झालं होतं आणि असं मानलं जात आहे की, याने अवयव दानाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यात मदत मिळेल. यूनिव्हर्सिट ऑफ मेरीलॅंड मेडिकल स्कूलने या संबंधी सांगितलं होतं की, ट्रान्सप्लांटनंतर रूग्ण पूर्णपणे बरा आहे.

अवयव दानासाठी वेटींग लिस्ट

असं असलं तरी हार्ट ट्रान्सप्लांटनंतरही रूग्णाच्या आजारावर उपचार निश्चित नाही. पण ही सर्जरी प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये ट्रान्सप्लांटबाबत मोठी कामगिरी आहे. डेविड बेनेट नावाच्या रूग्णामध्ये गंभीर आजार आणि वाईट आरोग्यामुळे मनुष्याचं हृदय ट्रान्सप्लांट केलं जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यााल जेनेटिकली मॉडिफाइड डुकराचं हृदय लावलं. दरम्यान अमेरिकेत कमीत कमी १० हजार रूग्ण अवयव दानाच्या वेटींग लिस्टमध्ये आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाMedicalवैद्यकीयJara hatkeजरा हटके