US Israel Iran War : पश्चिम आशियातील तणाव आता स्फोटक स्थितीत पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अंतिम इशारा दिला आहे. "हॉर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ खुली करा, अन्यथा अमेरिका इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विनाशकारी हल्ला करेल," असे ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी राजनैतिक मार्गासाठी ६ एप्रिल पर्यंतची मुदत दिली होती, परंतु अचानक बदललेल्या सुरामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची 'ऊर्जा वाहिनी' आहे. ती बंद राहिल्याने जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असून अमेरिकेने आता याला 'आंतरराष्ट्रीय सुरक्षा' आणि 'ऊर्जा स्थिरता' या दृष्टीकोनातून पाहत लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत.
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
४८ तासांची दिली मुदत
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्रमकपणे लिहिले आहे की, वेळ निघून जात आहे. इराणला कराराला सहमती देण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी आधीच वेळ देण्यात आला होता, पण आता फक्त ४८ तास शिल्लक आहेत. ही मुदत ओलांडल्यास, अमेरिका इराणवर विनाशकारी हल्ला करेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल आशावाद व्यक्त केला होता. त्यांनी मुदतवाढ १० दिवसांनी, म्हणजेच ६ एप्रिलपर्यंत दिली होती. या कृतीतून वॉशिंग्टनला अजूनही राजनैतिक मार्ग खुले ठेवायचे आहेत, असा संकेत मिळाला. पण आता त्यांचा सूर बदलला आहे. संयम संपत चालला आहे आणि यानंतर मोठे हल्ले केले जातील, असे ट्रम्प म्हणाले.
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक मानली जाते, तिथून जागतिक तेल पुरवठ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग वाहून नेला जातो. यात कोणताही व्यत्यय आल्यास त्याचे परिणाम केवळ प्रादेशिकच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतात. यामुळे अमेरिकेने या मुद्द्याकडे फक्त एक प्रादेशिक विवाद म्हणून न पाहता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जा स्थिरतेचा विषय म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे.
हा मुद्दा आता फक्त राजनैतिक वाटाघाटींपुरता मर्यादित राहिलेला नाही. ४८ तासांच्या इशाऱ्यावरून हे सूचित होते की, येणारे दिवस निर्णायक असतील. इराणने अजूनही औपचारिक प्रतिसाद दिलेला नाही, पण वेगाने बदलणारी परिस्थिती दोन्ही देशांमधील तणाव एका नव्या पातळीवर नेऊ शकतो.
Web Summary : Trump issued a 48-hour ultimatum to Iran, demanding the Hormuz Strait's immediate opening. Failure would trigger a devastating US attack, citing international security and energy stability concerns amid rising tensions.
Web Summary : ट्रंप ने ईरान को 48 घंटे का अल्टीमेटम जारी किया, होर्मुज जलडमरूमध्य को तुरंत खोलने की मांग की। विफलता से विनाशकारी अमेरिकी हमला होगा, बढ़ते तनाव के बीच अंतरराष्ट्रीय सुरक्षा और ऊर्जा स्थिरता चिंताओं का हवाला दिया।