शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:19 IST

US Israel Iran War Update: इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी सैन्याला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले असले तरी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी आपल्या सैन्याला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले असले, तरी त्यांनी अमेरिकेला कडक शब्दांत सुनावले आहे. "ही युद्धबंदी म्हणजे युद्धाचा शेवट नाही," असे म्हणत खामेनेई यांनी भविष्यातील संघर्षाचे संकेत दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करत असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र, ही युद्धबंदी 'होर्मुजची सामुद्रधुनी' पूर्णपणे खुली ठेवण्याच्या अटीवर करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर इराणमध्ये विजयाचा जल्लोष साजरा होत असला, तरी लष्करी पातळीवर अद्याप तणाव कायम आहे.

'आमचे हात ट्रिगरवरच' - इराणचा इशारा

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले की, जरी आम्ही सध्या गोळीबार थांबवला असला, तरी आमचे लक्ष शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आहे. इराणच्या सरकारी वाहिनीवर मोज्तबा खामेनेई यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. यात त्यांनी म्हटले आहे की, "सर्व लष्करी शाखांनी आदेशाचे पालन करून गोळीबार थांबवावा, पण सावध राहावे. शत्रूने थोडी जरी चूक केली, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल."

इराणच्या त्या '१० अटी' ज्यावर अमेरिका झाली मवाळ

ट्रम्प यांनी सांगितले की, इराणकडून त्यांना १० कलमी प्रस्ताव प्राप्त झाला आहे, जो चर्चेसाठी योग्य आहे. इराणने प्रामुख्याने खालील मागण्या ठेवल्या आहेत:

१. कोणतेही आक्रमण नाही२. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम३. संवर्धनाची स्वीकृती४. सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे ५. सर्व दुय्यम निर्बंध हटवणे ६. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करणे७. आयएईएच्या नियामक मंडळाचे सर्व ठराव रद्द करणे ८. इराणला नुकसान भरपाई देणे९. या प्रदेशातून अमेरिकेच्या लढाऊ सैन्याची माघार१०. लेबनॉनमधील शौर्यपूर्ण इस्लामी प्रतिकारासह सर्व आघाड्यांवरील शत्रुत्व थांबवणे 

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran War: Ceasefire declared, but Khamenei warns of future conflict.

Web Summary : Trump announced a two-week ceasefire with Iran after discussions with Pakistani leaders. Khamenei ordered a halt to firing but cautioned vigilance, warning of retaliation for any enemy mistake. Iran presented ten demands, including lifting sanctions and US troop withdrawal.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पWarयुद्ध