शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

US Israel Iran War : युद्धाची आग भडकली! इराणकडून हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा, दुबईत शक्तिशाली स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:48 IST

मध्यपूर्वेतील युद्ध आता हिंद महासागरापर्यंत पसरले आहे. इराणने शनिवारी डिएगो गार्सिया येथील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून जगाला धक्का दिला. ही क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आल्याची पुष्टी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

मध्य पूर्वेतील युद्ध अधिकच चिघळत आहे. शनिवारी, इराणने हिंद महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यानंतर लगेचच दुबईतील हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. हिंद महासागरातील हे युद्ध अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची युद्धनौका 'इरिस देना' बुडवल्यानंतर आणखी वाढले आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यात ८५ हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता.

Ashok Kharat Case : अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ आला समोर! अल्पवयीन मुलगीवर केबल टेस्टरने उपचार, कारनामे उघड

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने शनिवारी हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या भूभागापासून सुमारे ४,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या या तळावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. इराणने डागलेली दोन्ही क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक क्षेपणास्त्र हवेतच निकामी झाले, तर दुसरे अमेरिकेच्या युद्धनौकेवरून डागलेल्या एका इंटरसेप्टर क्षेपणास्त्राने नष्ट केले.

डिएगो गार्सिया हे चागोस बेटांमध्ये वसलेले आहे. ते एक महत्त्वाचे अमेरिका-ब्रिटन लष्करी तळ आहे, याचा उपयोग अफगाणिस्तान आणि इराकमधील अमेरिकेच्या बॉम्बहल्ला मोहिमांसाठी एक तळ म्हणून केला आहे.

इराणने डिएगो गार्सियाला लक्ष्य केल्यामुळे लष्करी तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे. आतापर्यंत इराणच्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता मर्यादित मानली जात होती, पण या हल्ल्यामुळे आता इराणकडे युरोपीय देशांना लक्ष्य करण्याची क्षमता असल्याचे दिसत आहे. पेंटागॉनने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु रणनीतीकारांच्या मते यामुळे युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.

माजी केंद्रीय मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, जर इराणने डिएगो गार्सियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यामुळे युद्धाची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे. तिवारी यांच्या मते, इराणने पश्चिमेला एक स्पष्ट संदेश दिला आहे की ते मध्य-पूर्वेच्या पलीकडे आणि दक्षिणेकडेही हल्ला करू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran strikes US-UK base; Middle East conflict escalates sharply.

Web Summary : Iran attacked the US-UK base in Diego Garcia, escalating Middle East tensions. Ballistic missiles were fired, triggering Dubai's air defenses. The attack followed the sinking of an Iranian warship by a US submarine. Experts fear Iran's reach now extends to Europe.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण