शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:35 IST

F 15 लढाऊ विमान पाडल्यानंतर पायलट बेपत्ता झाल्याचे समोर आले तेव्हा या पायलटला सुखरूप परत आणण्यासाठी अमेरिकेने त्यांची सर्व ताकद पणाला लावली

इराणच्या जमिनीवर पडलेल्या F 15 फायटर जेटच्या दुसऱ्या क्रू मेंबरलाही अमेरिकेने शोधले आहे. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सने धोकादायक परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले. एका पायलटला सुखरुप आणल्यानंतर दुसऱ्या क्रू मेंबरलाही चहुबाजूने होणाऱ्या गोळीबारातून रेस्क्यू केले आहे. रेस्क्यू केल्यानंतरही ऑपरेशन अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अमेरिकन पायलटला इराणच्या बाहेर काढलं गेल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकन सैन्याच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती समोर आलीय की, F 15 च्या दुसऱ्या बेपत्ता पायलटला शनिवारी रात्री शोधण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी अमेरिकेने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. या ऑपरेशनचे काही व्हिडिओही समोर आलेत. ज्यात इराणी पोलीस अमेरिकन हेलिकॉप्टर्सवर अंदाधुंद गोळीबार करताना दिसते तर दुसरीकडे अमेरिकन सैन्य त्यातून स्वत:ला वाचवत आपल्या सहकाऱ्याचा शोध घेत होते. या सर्व परिस्थितीत अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेजने त्यांचे शौर्य दाखवले आणि पायलटला परत आणण्यास यशस्वी झाले.

१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर...अमेरिकेने लावली ताकद

अमेरिकेचे आतापर्यंत अनेक फायटर जेट पाडल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र अमेरिकन सैन्याने इराणचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटलं आहे. मात्र यात F 15 लढाऊ विमान पाडल्यानंतर पायलट बेपत्ता झाल्याचे समोर आले तेव्हा या पायलटला सुखरूप परत आणण्यासाठी अमेरिकेने त्यांची सर्व ताकद पणाला लावली. कुठल्याही परिस्थितीत अमेरिकेचा हा पायलट जिवंत इराणी सैन्याच्या हाती लागू नये असा अमेरिकेचा प्रयत्न होता. त्यामुळे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अमेरिकेचे १०० कमांडर काम करत होते. १२ हेलिकॉप्टर अशा भागांवर नजर ठेवत होते, जिथे हे लढाऊ विमान कोसळले. अनेक तासांच्या मेहनतीनंतर अखेर अमेरिकेने दुसऱ्या पायलटलाही सुरक्षित शोधले. पहिल्या पायलटला त्याचवेळी शोधण्यात आले जेव्हा हे विमान खाली कोसळले. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केली की, मागील काही तासांमध्ये अमेरिकन सैन्याने त्यांच्या एका अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी अत्यंत कठीण रेस्क्यू ऑपरेशन राबवले. जो बेपत्ता अधिकारी आता सुरक्षित आहे. हा अधिकारी इराणच्या डोंगराळ भागात शत्रूच्या गराड्यात अडकला होता. अमेरिकन सैन्य सातत्याने त्याचे लोकेशन पाहत होती. सैन्याच्या देखरेखीत हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले गेले. माझ्या आदेशानंतर अनेक विमाने आणि घातक शस्त्रे पाठवून त्या अधिकाऱ्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. शत्रूच्या परिसरात घुसून २ अमेरिकन पायलटला वेगवेगळ्या ठिकाणांहून सुरक्षित बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ आहे असं ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा होता प्रश्न

४४ वर्षापूर्वी १९७९-८० च्या दशकात इराणमध्ये अमेरिकन दूतावासात ५२ अमेरिकन नागरिकांना बंधक बनवण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी ऑपरेशन ईगल क्लॉ नावाने रेस्क्यू ऑपरेशन चालवले परंतु तिथे पोहचलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. एप्रिल १९८० मध्ये अमेरिकन कमांडो इराणच्या वाळवंटात उतरले. खराब वातावरण, तांत्रिक बिघाडामुळे अनेक हेलिकॉप्टर काम करू शकले नाहीत. मिशनवेळी हेलिकॉप्टर आणि विमानाची धडक झाली. ज्यात ८ अमेरिकन सैन्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हे मिशन अर्धवटच सोडावे लागले. ही अमेरिकन सैन्यासाठी नाचक्कीची बाब होती. त्यानंतर अमेरिकेने आपल्या स्पेशल फोर्सेज आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक धोरणात्मक बदल केले. त्यामुळे इराणमधील अमेरिकन पायलटला सुरक्षित परत आणणं हा बलाढ्य अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा विषय होता.

English
हिंदी सारांश
Web Title : US Rescues Pilots in Iran: Avoiding a 1979 Repeat?

Web Summary : US forces rescued two downed pilots in Iran amid heavy fire. A massive operation, involving 100 commanders and 12 helicopters, ensured their safe return, averting a potential hostage crisis reminiscent of 1979.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प