शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:32 IST

US-Iran War Impact: इराण युद्धामुळे अमेरिकेत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. वाहनधारकांना अतिरिक्त अब्जावधी डॉलर्स मोजावे लागत असून जागतिक तेल संकट गडद झाले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या खिशावरही मोठे 'बॉम्ब' पडत आहेत. ताज्या अहवालानुसार, इराण युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेतील वाहनधारकांना इंधनासाठी अतिरिक्त अब्जावधी डॉलर्स मोजावे लागले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे अमेरिकेतील गॅसोलीनचे (पेट्रोल) दर गगनाला भिडले आहेत.

अहवालानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकन ड्रायव्हर्सनी इंधनावर दररोज सरासरी ३० ते ४० टक्के अधिक खर्च केला आहे. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पार गेल्यामुळे आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम अमेरिकेतील 'रिटेल' इंधन दरांवर झाला आहे.

ट्रम्प सरकारवर दबाव वाढलानिवडणुकीत इंधन दर कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. युद्धामुळे अमेरिकेतील महागाईचा दर वाढला असून, लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यामुळे भविष्यात इंधन दर आणखी वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतावर काय होणार परिणाम?अमेरिकेप्रमाणेच भारत देखील आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेसाठी ८०% हून अधिक आयातीवर अवलंबून आहे. जर अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेला इतका मोठा फटका बसत असेल, तर भारतीय बाजारपेठेतही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. इराणने भारताला विशेष सवलत दिली असली तरी, जागतिक स्तरावर वाढलेले विम्याचे दर आणि मालवाहतूक खर्च सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran tensions hit US pockets; Trump's gamble fuels global fears.

Web Summary : US drivers face soaring gas prices due to Iran conflict, straining Trump's promises and raising inflation fears. India, heavily reliant on oil imports, braces for potential fuel price hikes amidst global uncertainty and rising costs.
टॅग्स :AmericaअमेरिकाFuel Crisisइंधन टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध