अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये गोळीबार, १६ जखमी

By Admin | Updated: November 23, 2015 11:03 IST2015-11-23T09:34:32+5:302015-11-23T11:03:02+5:30

अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथील एका पार्कमध्ये गोळीबार झाल्याने १६ जण जखमी झाले आहेत.

US firing in New Orleans, 16 injured | अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये गोळीबार, १६ जखमी

अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये गोळीबार, १६ जखमी

>ऑनलाइन लोकमत
न्यू ऑर्लिन्स, दि. २३ - अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथील एका पार्कमध्ये गोळीबार झाल्याने १६ जण जखमी झाले आहेत. एका स्थानिक वृत्तवाहिनीने ही माहिती दिली. 
न्यू ऑर्लिन्स येथील बनी फ्रेंड पार्कमध्ये संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यासाठी सुमारे ५०० नागरिक मैदानात जमले होते. त्या दरम्यानच दोन अज्ञात बंदूकधा-यांनी तेथील उपस्थितांवर गोळीबार सुरू केला. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात १६ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
गर्दीने भरलेल्या पार्कमध्ये २ बंदूकधा-यांनी अचानक बेछूट गोळीबार केला आणि अनेक लोक जखमी होऊन जमीनीवर कोसळले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 

Web Title: US firing in New Orleans, 16 injured