अमेरिकाच्या कोलोरॅड येथे गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: November 28, 2015 09:23 IST2015-11-28T09:19:54+5:302015-11-28T09:23:27+5:30

कोलोरॅडॉमधील कुटुंब नियोजन केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह तीन ठार, तर ९ जण गंभीर जखमी आहेत.

US firing in Colorado, killing 3 people | अमेरिकाच्या कोलोरॅड येथे गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

अमेरिकाच्या कोलोरॅड येथे गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

कोलोरॅडॉ स्प्रिंग्ज (अमेरिका) , दि.२८ - कोलोरॅडॉमधील कुटुंब नियोजन केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह तीन ठार, तर ९ जण गंभीर जखमी आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची ओळख आणि हल्ल्यामागील कारणाचा तपास घेतला जात आहे.
स्थानिक प्रमाणेवेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११.३०च्या सुमारास हा हल्ला झाला. ही कारवाई जवळपास पाच तास चालू होती. यासंदर्भातील अधिक माहिती मिळालेली नाही. हल्ल्याचे लक्ष्य कुटुंब नियोजन केंद्रच होते का, यासंदर्भातही अधिक तपशील समोर आलेले नाहीत. ह्यसीएनएनह्यने दिलेल्या वृत्तानुसार, कुटुंब नियोजन केंद्रास यापूर्वी धमकी अथवा हल्ल्याचा इशारा देण्यात आला नव्हता.
या हल्ल्यामागील हेतू अद्याप समजला नसला, तरीही कुटुंब नियोजनाशी संबंधित केंद्रांवर यापूर्वीही किरकोळ हल्ले झालेले आहेत. या घटनेची माहिती अध्यक्ष बराक ओबामा यांनाही देण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह ह्यएफबीआयह्य आणि दहशतवादविरोधी पथकही या घटनेचा तपास करत आहे.

Web Title: US firing in Colorado, killing 3 people