अमेरिकेत गोळीबार, 5 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: September 25, 2016 12:57 IST2016-09-25T12:57:28+5:302016-09-25T12:57:28+5:30
अमेरिकेच्या वॉशिंगटनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू,पोलिसांनी एका 20 वर्षिय संशयित तरूणाला

अमेरिकेत गोळीबार, 5 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
वॉशिंगटन, दि. 25- अमेरिकेच्या वॉशिंगटनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला. वॉशिंगटनच्या कास्केड मॉलमध्ये गोळीबार कऱण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका 20 वर्षिय संशयित तरूणाला ताब्यात घेतले आहे. त्याचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का याबाबत चौकशी सुरू आहे.
कास्केड मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 4 महिला तर एका पुरूषाचा मृत्यू झाला. ताब्यात घेण्यात आलेला तरूण हा तुर्कीचा स्थालांतरीत आहे.