US ELECTION - प्रत्यक्ष मतदानाआधीच अमेरिकेत विक्रमी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 18:13 IST2016-11-08T17:11:43+5:302016-11-08T18:13:33+5:30
प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधीच अमेरिकेत तब्बल ४ कोटी ६० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
US ELECTION - प्रत्यक्ष मतदानाआधीच अमेरिकेत विक्रमी मतदान
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधीच अमेरिकेत तब्बल ४ कोटी ६० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१२ च्या तुलनेत अर्ली व्होटींगमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. अमेरिकन निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदाराला प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाआधी सुद्धा मतदान करता येते.
यामध्ये पोस्टल वोटस आणि मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येते. आजच्या मतदानामध्ये जवळपास २० कोटी अमेरिकन नागरीक सहभागी होऊ शकतात. २०१२ मध्ये ३ कोटी २० लाख मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाआधी मतदानाचा हक्क बजावला होता.
इतक्या मोठया प्रमाणावर आधीच मतदान होणे हा अमेरिकेत मतदानाचा पॅटर्न बदलल्याचा संकेत आहे असे तज्ञांनी सांगितले.
आणखी वाचा
यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीत मोठया प्रमाणात वाढ होईल तसेच हिलरी क्लिंटन यांना फायदा होईल असे निवडणूक तज्ञांनी सांगितले. जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग वाढवणे आणि मतदान केंद्रावर गर्दी टाळणे हा अर्ली व्होटींगचा उद्देश असतो.