US ELECTION - शेवटच्या टप्प्यात हिलरी क्लिंटन यांना निसटती आघाडी
By Admin | Updated: November 8, 2016 18:22 IST2016-11-08T11:01:23+5:302016-11-08T18:22:05+5:30
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त काही तासांचा अवधी उरला असताना फॉक्स न्यूजचा मतदानपूर्व सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे.

US ELECTION - शेवटच्या टप्प्यात हिलरी क्लिंटन यांना निसटती आघाडी
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त काही तासांचा अवधी उरला असताना फॉक्स न्यूजचा मतदानपूर्व सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे. प्रत्यक्ष मतदानाआधीचा हा शेवटचा सर्वेक्षण अहवाल असून यात डॅमोक्रॅटीक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चार टक्क्यांची निसटती आघाडी घेतली आहे.
फॉक्स न्यूजचा हा अहवाल हिलरी समर्थकांसह जगातील अनेक देशांना दिलासा देणारा आहे. क्लिंटन यांना ४८ टक्के तर ट्रम्प यांना ४४ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. महिलांमध्ये हिलरी १२ पाँईटस, अफ्रिकन-अमेरिकन्समध्ये ८५ पाँईटस, हिस्पॅनिक्समध्ये ३३ पाँईटस आणि अंडर ३०मध्ये १६ पाँईटसनी आघाडीवर आहेत.
पुरुषांमध्ये ट्रम्प ५ पाँईटस, गो-यांमध्ये १७ पाँईट आणि कॉलेज पदवी नसलेल्या गो-या मतदारांमध्ये ३१ पाँईटसची आघाडी आहे. अनुभवी मतदारांची ट्रम्प यांना पसंती आहे तर, पहिल्यांदा मतदान करणा-यांची क्लिंटन यांना पसंती आहे.
नऊ टक्के रिपब्लिकन्सचा क्लिंटन यांना पाठिंबा आहे. ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक समर्थकांकडून मिळणा-या पाठिंब्यापेक्षा ही टक्केवारी जास्त आहे. तीन ते सहा नोव्हेंबर दरम्यान १४१० नोंदणीकृत मतदारांशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन फॉक्स न्यूजने हा अंदाज वर्तवला आहे.