US ELECTION- हिलरी क्लिंटन यांनी मिळवला पहिला विजय
By Admin | Updated: November 8, 2016 18:19 IST2016-11-08T11:40:04+5:302016-11-08T18:19:32+5:30
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांनी पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

US ELECTION- हिलरी क्लिंटन यांनी मिळवला पहिला विजय
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांनी पहिल्या विजयाची नोंद केली आहे. न्यू हॅम्पशायर प्रांतातील डिक्सविले नॉच या गावामध्ये झालेल्या मतदानात हिलरी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. क्लिंटन यांना चार मते मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांना दोन, लिबरेशन उमेदवार गॅरी जॉन्सन यांना अवघे एक मत मिळाले.
२०१० च्या जनगणनेनुसार डिक्सवेल नॉच गावाची लोकसंख्या अवघी १२ आहे. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्री डिक्सविले नॉचमध्ये सर्वात पहिले मतदान होते. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा सर्वात पहिला निकाल इथेच जाहीर होतो. १९६० पासून इथे मतदानाची परंपरा सुरु आहेत. प्रारंभी इथे नऊ मतदार होते.
आणखी वाचा
२०१२ मध्ये डिक्सविले नॉचमध्ये रिपब्लिकन उमेदवार रोमनी आणि डेमोक्रॅटिक उमेदवार बराक ओबाम यांना समसमान मते मिळाली होती. दोघांना प्रत्येकी पाच मते मिळाली होती. २००८ मध्ये या गावातून विजय मिळवणारे बराक ओबामा पहिले डेमोक्रॅटिक उमेदवार ठरवले होते.