शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:40 IST

Donald Trump vs Kamala Harris, US Elections: २०१६ च्या निवडणुकीतही ट्रम्प यांच्या विजयात या विभागातील राज्यांनी मोठी भूमिका बजावली होती.

Donald Trump vs Kamala Harris, US Elections 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे ५ आठवडे उरले असून, राष्ट्रीय सर्वेक्षणात सातत्याने आघाडीवर असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना आता मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षीय निवडणुकीत निर्णायक मानल्या जाणाऱ्या ७ पैकी ५ स्विंग राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत सध्या खूपच रंजक असल्याचे दिसून येत आहे. 'अ‍ॅटलासइंटेल'च्या ताज्या सर्वेक्षणात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ पैकी ५ स्विंग राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल ठरवण्यात स्विंग राज्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

स्विंग राज्यांमध्ये ट्रम्प यांचे वर्चस्व!

काही दिवसांपूर्वी कमला हॅरिस ७ पैकी ६ राज्यांमध्ये आघाडीवर होत्या. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. AtlasIntel च्या ताज्या सर्वेक्षणात, कमला फक्त उत्तर कॅरोलिना आणि नेवाडा या दोन राज्यांमध्येच ट्रम्प यांच्या पुढे आहेत. त्यांची आघाडी अनुक्रमे २ आणि ३ गुणांची आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि ऍरिझोनामध्ये आघाडी मिळाली असल्याचे दिसले आहे. जॉर्जिया आणि ॲरिझोनामध्ये ट्रम्प केवळ एका गुणाने पुढे असले तरी, पेनसिल्व्हेनियामध्ये ९० इलेक्टोरल मते असलेल्या ट्रम्प यांची आघाडी ३६ गुणांची आहे. मिशिगनमध्येही ट्रम्प कमला हॅरिस यांच्यापेक्षा ३ गुणांनी पुढे आहे. याशिवाय त्यांच्याकडे विस्कॉन्सिनमध्ये २ गुणांची आघाडी आहे.

इलॉन मस्क यांचा खोचक टोमणा

ट्रम्प यांचे मित्र आणि SpaceX चे CEO इलॉन मस्क यांनी ट्विटरवरून डेमोक्रॅटिक पक्षाचा समाचार घेतला. मस्क यांनी लिहिले की, डेमोक्रॅटिक पक्ष स्विंग राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षापेक्षा जास्त पैसा खर्च करत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या देणगीदारांच्या यादीचा संदर्भ देत त्यांनी लिहिले की, डेमोक्रॅटिक पक्ष हा श्रीमंतांचा आणि अधिकाऱ्यांचा पक्ष झाला आहे, तर रिपब्लिकन पक्ष हा लोकांचा पक्ष आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मस्कने रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाला देणगी देणाऱ्या देणगीदारांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार कमला हॅरिस यांना गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲमेझॉनसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत.

ट्रम्प यांनी २०१६ मध्ये व्यक्त केली होती नाराजी

स्विंग राज्यांच्या ताज्या सर्वेक्षणात निकाल बदलला असल्याने आता कमला हॅरिस यांच्यासाठी मोठी अडचण होऊ शकते. कारण २०१६ मध्ये जेव्हा ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात स्पर्धा होती, तेव्हाही स्विंग राज्यांनी ट्रम्प यांच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना ४८ टक्के मते मिळाली होती तर डोनाल्ड ट्रम्प यांना ४५.९ टक्के मते मिळाली होती. पण ट्रम्प यांनी विजयासाठी आवश्यक २७२ इलेक्टोरल मते मिळवली होती.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPresidentराष्ट्राध्यक्षKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिका