शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मिशन शक्ती ही काळाची गरज, अमेरिकेकडून उपग्रहविरोधी चाचणीबाबत भारताचा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:27 IST

भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अभियानाद्वारे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता.

वॉशिंग्टन - भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अभियानाद्वारे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता. दरम्यान, भारताने केलेल्या या चाचणीबाबत नासाने नाराजी व्यक्त केली असतानाच अमेरिकेन संरक्षण मंत्रालयाने मात्र या मोहिमेबाबबत भारताचा बचाव केला आहे. अंतराळामधील धोक्यांबाबत भारत चिंतीत आहे. त्यामुळे  भारताने केलेले उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राचे परीक्षण ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेने दिली आहे. मिशन शक्ती या चाचणीअंतर्गत अंतराळातील उपग्रह नष्ट केल्यामुळे भारत अशी क्षमता बाळगणारा अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनंतरचा चौथा देश बनला आहे. दरम्यान, अमेरिकेन संरक्षण खात्यातील अधिकारी जॉन ई हितेन यांनी सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीसमोर भारताने केलेल्या मिशन शक्तीबाबतची माहिती मांडली. ''भारत त्याच्यासमोर अंतराळामधून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबाबत चिंतीत आहे. त्यामुळेच त्यांनी अंतराळातील उपग्रह उद्ध्वस्त करण्याची चाचणी घेतली असावी, असे त्यांनी सांगितले.  यावेळी जॉन ई हितेन यांनी भारताने केलेल्या उपग्रहविरोधी चाचणीची गरज तसेच त्यामुळे अंतराळात पसलेला कचरा याबाबतच्या प्रश्नांनाही उत्तर दिले. भारताने अंतराळातील उपग्रह उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या मदतीने उद्ध्वस्त केल्यानंतर नासाने याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच या चाचणीमुळे अंतराळात पसरलेल्या तुकड्यांमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका पोहोचेल अशी भीती व्यक्त केली होती.  

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीIndiaभारतUnited Statesअमेरिका